कार्पोरेट हॉस्पिटलच्या मनमानीला कोरोना संकटात चाप बसवणारी – अक्षरा घोडके

37

ऑपरेशन हॉस्पिटल ही सध्या नाशिक जिल्ह्यात लोकचळवळ होत आहे. सध्या खाजगी हॉस्पिटल रुग्णांना उपचार करताना मनमानी करीत आहे वाट्टेल तितकी बिले आकारत आहे या सर्वांवर अंकुश राहावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने खाजगी हॉस्पिटल वर बिलांचा हिशोब करण्यासाठी कर्मचारी नेमले आहे मात्र हे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत आहे यावर अंकुश बसवण्यासाठी पंधरा वर्ष हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांमध्ये काम केलेली अक्षरा घोडके सध्या खाजगी हॉस्पिटलच्या बिलांचे शासनाच्या नियमाप्रमाणे ऑडीट करीत आहे। हे सर्व काम ती मोफत करीत असून रुग्णांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी अक्षरा घोडके खाजगी हॉस्पिटल ची ऑडिटर बनली आहे.

नाशिककर असणारी अक्षरा घोडके यांनी बी ए मानसशास्त्र व एमबीए मार्केटिंग चे शिक्षण घेतले आहे पंधरा वर्षे तिने विविध हॉस्पिटलमध्ये नोकऱ्या केल्यानंतर हॉस्पिटलचा काळाबाजार आणि रुग्णांची फसवणूक पहिली, हे पाहून तिने या क्षेत्रातून सेवानिवृत्ती घेतली . कुटुंबाला हातभार लागावा म्हणून तिने सध्या साड्यांचा व्यवसाय टाकला आहे. नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या कोरोणाच्या थैमानात खाजगी हॉस्पिटल रुग्णांकडून वारेमाप बिल वसूल करत आहे रुग्णांना वेड्यात काढून वारेमाप बील लावले जात आहे वैद्यकीय उपकरणाचे दर दुप्पट-तिप्पट-चार पटीने लावले जात आहे यासंदर्भात रुग्णांना कल्पना नसते रुग्ण केवळ जास्त बिल झाले म्हणून ओरड करतात मात्र हे बिल नियमानुसार लावले आहे का?

याचे ज्ञान रुग्णांना नसते म्हणून नाशिक मध्ये राहणाऱ्या अक्षरा घोडके सध्या खाजगी हॉस्पिटलच्या ज्यादा लावलेल्या बिलांच्या विरोधात लढत आहे रुग्ण आर्थिक होरपळला जाऊ नये यासाठी तिने सामाजिक कर्तव्य म्हणून लोकांना ऑनलाइन व प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑडिटिंग ची सेवा द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी तिने आज पर्यंत 25 हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवली आहे आज पर्यंत किमान 1 कोटी रुपयांचे जादा बिल वाचवले आहे म्हणून सध्या सोशल मीडिया सह नागरिकांमध्ये अक्षरा घोडके ही सोशल ऑडिटर म्हणून ओळखली जात आहे।

✒️हर्षवर्धन बोऱ्हाडे(9226560205)