अभिमानास्पद – उपळवटे (सोलापूरची) केळी थेट इरा कच्या बाजारात

44

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.24एप्रिल):-उपळवटे ता. माढा जि. सोलापूर गावातील प्रगतशिल शेतकरी *श्री. भालचंद्र गरड-पाटील* यांनी त्यांच्या शेतामध्ये दर्जेदार केळी पीकवली,आणि ही थेट इराकला एक्सपोर्ट करण्यात आली.कंदरचे व्यापारी दादा पाटील यांनी 16रू प्रती किलो दराने भाव दिला त्यांना आडीच एकरात 13लाख रुपयाचे उत्पन निघाले.

भरपूर मेहनत,योग्य नियोजन, अचूक बाजार भावाचा अंदाज,योग्य मार्गदर्शन, या गोष्टी लक्षात ठेवून शेती केली तर ती कधीच तोट्यात जात नाही याच उत्तम उदाहरण म्हणजे भालचंद्र गरड-पाटील होत. उपळवटे सारख्या खेड्यागावातील शेतकर्‍याचा माल इराकच्या बाजार पेठेत गेल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकर्यांसाठी भालचंद्र गरड-पाटील हे एक नवीन आदर्श ठरत आहेत.