खांमगाव सामान्य रुग्णालयातील नविन आयसोलेशन वॉर्ड च्या आमदार आकाश फुंडकर कडुन कामाची पाहणी

23

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

खामगाव(दि.24एप्रिल):- कोव्हीड रुग्णांकरिता सुरू असलेल्या खामगाव सामान्य रुग्णालयातील नविन आयसोलेशन वॉर्ड च्या कामाची आमदार फुंडकर यांनी पाहणी केली. येत्या 2 ते 3 दिवसांत काही बेड्स रुग्णांकरिता उपलब्ध होतील जेणेकरून रुग्णांना ताबडतोब औषधोपचार उपलब्ध होईल.

यावेळी शहरातील प्रतिष्ठित दानशूर उद्योजक श्री.बिपीनसेठ गांधी, श्री.प्रमोदसेठ अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.निलेश टापरे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री.संजय शिनगारे, नगरसेवक श्री.राकेश राणा, युवा मोर्चाचे शहर संघटक श्री. नगेंद्र रोहणकार सोबत होते. यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी काही महत्वपूर्ण सूचना करून लगेच काम पूर्ण करावे व नागरिकांच्या सेवेत वॉर्ड समर्पित करावा असे सांगितले.