चौदाव्या आयोगातून खेरवाडी (नारायणगाव) स्मशानभूमी दुरुस्तीचे कामकाज अंतिम टप्प्यात

30

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.25एप्रिल):-नारायणगाव ग्रामपंचायत 14 व्या वित्त आयोगातून खेरवाडी येथील नादुरुस्त झालेल्या स्मशानभूमीचे कामकाज त्यात वरील नवीन पत्रे,कलर काम, गेनोलाइज(लोखंडी) शेवदानी, राखेचे पाणी जाण्याची सोय, परिसराची स्वच्छता आदी कामे प्रगतिपथावरती असल्याची माहिती खेरवाडी सरपंच सौ अश्विनी दीपक जाधव, उपसरपंच श्री विजय रामचंद्र लांडगे, सदस्य सोपानराव राजाराम संगमनेरे, कैलास निवृत्ती संगमनेरे, उमेश वसंत पगारे रक्षा सोमनाथ उगले, योगिता कृष्णा लांडगे, विमल भाऊसाहेब नीपुंगळे, अँड. संदीप केदु पवार, प्रतिभा अरुण संगमनेरे, रुपा विलास पाटील, पुष्पा अनिल संगमनेरे, रतन पांडुरंग बांडे ग्रामसेवक दहिफळे आदींनी दिली.

सदरच्या कामकाज पूर्णत्वासाठी माजी सरपंच व सदस्य सोपानराव संगमनेरे यांचे नेतृत्वाखाली उपसरपंच विजय लांडगे, संदीप जाधव, पप्पू उगले, उमेश पगारे, कैलास संगमनेरे, कृष्णा लांडगे, भाऊसाहेब निपुंगळे आदींच्या संकल्पनेतून व प्रत्यक्ष देखरेखीखाली पूर्णत्वास जात आहे*. *सदरच्या कामकाजास स्वयंस्फूर्तीने खेरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश संगमनेरे यांचेही वेळोवेळी ट्रॅक्टर पाणी यासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहेत*.