मौजे राघूची वाडी येथे भारतीय सेना आणि महाराष्ट्र पोलीस दलातील जवान यांच्या मार्फत सार्वजनिक पानपोईचे उद्घाटन संपन्न

✒️उस्मानाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उस्मानाबाद(दि.25एप्रिल):-पासून जवळच असणाऱ्या राघूची वाडी या बसस्थानकावर, भारतीय सेनेचे कर्नल विनोद करवर व महाराष्ट्र पोलीस दलातील जवान, यांच्या मार्फत शंभर लिटर पाण्याची टाकी बसवून, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

सध्या परिस्थिती कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे, शासनाच्या नियमानुसार, सार्वजनिक अंतर व जमावबंदी असल्यामुळे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची अडचण पडू नाही, म्हणून कर्नल विनोद करवर व राघूची वाडी येथील महाराष्ट्र पोलीस दलातील जवान, यांनी एकत्र बसून विचार केला, व 100 लिटरची पाण्याची टाकी राघूची वाडी बसस्थानकावर ठेवून, पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली.

परंतु रोज पाणी कोणी भरावे व व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न पडला असता, राघूची वाडी येथील समाजसेवक धनंजय करवर यांनी, पाणी भरणे व लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, ही जबाबदारी स्वतावर घेतली. त्याबद्दल भारतीय सेनेचे कर्नल विनोद करवर व राघोजी वाडी येथील व महाराष्ट्र पोलीस दलातील जवान, यांनी धनंजय करवर यांचे, आभार व्यक्त केले.

यावेळी भारतीय सेना कर्नल विनोद करवर, अजित करवर, धनंजय करवर, शरद करवर, युवा नेतृत्व महादेव नारायण करवर , शशी यमगर, बबलू यमगर ,रवी बेलदार, पांडुरंग करवर, मधु गेजगे, बबलू कस्पटे, शिवाजी करवर, इत्यादी उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED