कोरोना काळात किराणा माल जास्त दरात विकणार्‍या दुकानदार व तेल एजन्सीज चालकावर गुन्हे दाखल करा- शेख अहेमद पटेल यांची मागणी

30

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

उमरखेड(दि.25एप्रिल):-कोरोना विषाणूचा वाढत्या विळख्यात पाहता राज्यशासनाने दि. १४ एप्रिल पासून ते १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केलीआहे.त्यातच उमरखेडच्या व्यापार्‍यांनी जनता कर्फ्युसाठी निवेदन देऊन बाजारपेठ बंद ठेवली. याचाच फायदा घेत छुप्या मार्गाने अर्ध्या शटरमध्ये दुकाने व खाद्य तेल विक्री चालू आहे, पत्येक तालुक्यातील कोरोनाने संपुर्ण जनता पिसाळलेली आहे आणी त्यात एकाही कुटुबांला हाताला काम नसल्यामुळे गोरगरीबांना लांगणाऱ्या अतिशय सामुग्री जीवनावश्यक वस्तू जर दामदुप्पट व जादा दराने विकल्या जात असतील तर गरीबांनी काय कराव कोणाकडे हात पसरांव या बाबत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी किराणा मालाचे भाव जाहीर केले.

त्यामध्ये साखर ३५ रु.किलो,गुळ ४५ रु.किलो,शेंगदाने १०० रु.किलो, तेल९५ रु.किलो,हरभरा दाळ ६० रु.किलो, तुरदाळ ९० रु किलो असे देण्याचा सल्ला दिला आहे,कोणत्याही प्रकारचे भाव फलंक न लावता हम करे सौ कायदा असा सावळा गोधळ सुरू आहे,असे आदेश्याला केराची टोपली समजुन मनमानी भाव सर्वसामाण्याना देत आहे.

परंतू हे दुकानदार जादा किमतीने माल विकत असल्याने एमआयएम चे सामाजीक कार्यकर्ता शेख अहेमद पटेल यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे तसेच भाजी विक्रेते मंडी मधून अतिशय स्वस्त दराने माल कमी दराने उचलुन मिळालेला भाजीपाला दामदुप्पट कीमतीने व पद्धतीने विक्री करीत असल्यामुळे त्यांच्यावर ही योग्य ति कार्यवाही होणे गरजेचे आहे ,सर्वच दामदुप्पटीने विक्री करणाऱ्यावर उचीत कारवाई करावी असे मत शेख अहेमद पटेल यांनी व्यक्त केले आहे, ~~~~~~~~~~~~~~~~~~