शिवशाही कोविड केअरला आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने मिळाले 45 ऑक्सिजन सिलेंडर

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.25एप्रिल):- येथे नव्यानेच सुरू झालेल्या शिवशाही कोविड सेंटरला आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांतून 45 ऑक्सिजन सिलेंडर मिळाल्याने शिवशाही कोविड सेंटरच्या व्यवस्थापनानाने सुटकेचा श्वास सोडला असला तरी त्याठिकाणी भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी ऑक्सिजनचा श्वास घेतला आहे.

दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सकाळीच 45 ऑक्सिजन सिलेंडरची खेप शिवशाही कोविड सेंटर ला पोहचल्यानंतर शिवशाही कोविड सेंटरचे सर्वेसर्वा श्री.दत्तात्रय लहाने सर यांनी आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांचे आभार व्यक्त केले. तसेच ऑक्सिजन सिलेंडरची खेप पोहचली म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांना शिवशाही कोविड केअर सेंटरला बोलावून त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ऍड.सुनील देशमुख, नगरसेवक मंदार बाहेकर, चंद्रकांत काटकर, विनायक भाग्यवंत, दीपक शेळके, समाधान निकाळजे,सय्यद आसिफ आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा असतांना आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांनी इतर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांटवरून बुलडाणा जिल्ह्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर मिळत आहेत. तसेच आठवड्यापासून चिखली शहर व बुलडाणा शहरातील खाजगी दवाखान्यात ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केल्या जात आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यासाठी 210 ऑक्सिजन सिलेंडर चा पुरवठा ताईंच्या प्रयत्नांनी झाला आहे. ही बाब लक्षात घेता प्रा.डी.एस.लहाने यांनी आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांना त्यांच्या शिवशाही कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा मिळून देण्याची विनंती केली असता आ.सौ.श्वेताताई महाले यांनी तातडीने ऑक्सिजन प्लांट व्यवस्थापना सोबत बोलून कोणताही पक्ष अभिनिवेश न ठेवता त्यांना ऑक्सिजन मिळवून दिला.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED