कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय उभारण्याकरिता तात्काळ परवानगी द्यावी – अतुल वांदीले

32

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.25एप्रिल):-कोरोना हया विषाणू ने आपले उग्र रूप धारण केल्यामुळे हिंगणघाट परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे रूग्णालयामध्ये बेड तुटवडा निर्माण झाला असून ऑक्सिजन ची सुध्दा कमतरता आहे परिणामी यामुळे अनेक कोविड रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू होत आहे.हिंगणघाट येथील कोविड झालेल्या रुग्णांची तसेच त्याच्या परिवाराची धावपळ होत असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यातच ऑक्सिजन असलेली रुग्णवाहिका शहरात उपलब्ध नाही आहे या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच आधार फाउंडेशन चे संस्थापक श्री.अतुल वांदिले यांनी स्वखर्चाने ६० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्या करिता पुढाकार घेतला असून शासनाकडून तसेच प्रशासनाकडून त्याकरिता परवानगी देवून ऑक्सिजन तसेच डॉक्टर ची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निवेदन जिल्हाधिकारी वर्धा मा. प्रेरणा देशभ्रतार यांना देण्यात आले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता खासदार श्री. रामदासजी तडस यांनी रूग्णालय उभारण्याकरिता पाठपुरावा केला .यावेळी परवानगी देण्याची विनंती करण्यात आली जर ही परवानगी तात्काळ देण्यात आली तर रुग्णालयाकरिता हाॅल,६० बेड,कोरोना रूग्णांसाठी दोन्ही वेळेचे भोजन इत्यादी सह रुग्णालय उभारण्यात येईल तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने कोविड रूग्णांकरिता ऑक्सीजनसह 200 बेडची व्यवस्था करावी अशी मागणी देखील आपल्या निवेदनातून केली निवेदन देतांना श्री. अमोल बोरकर,श्री.जगदीश वांदीले यांची उपस्थिती होती .