उद्यापासून दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सुरु होतेय “कोविडं सेंटर
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

माण(दि.25एप्रिल):-कित्येक दिवसापासून कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला असून तालुक्यातील काही गावामध्ये “जनता कर्फ्यु” लागू करून सुद्धा कोरोना संसर्ग आटोक्यात येत नाही आणि रुग्ण संख्या वाढ हि दुप्पट होत चालली आहे तालुक्यातील रुगणांना उपचार तर मिळतच नाहीत त्याबरोबर रुग्णालयात बेड सुद्धा मिळत नाहीत त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक हतबल झाले आहेत आणि ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे काही रुग्ण दगावत आहेत या अडचणी लक्षात घेता माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी येथील मुलीचे वसतिगृहात “कोविडं सेंटर” उभारण्याचे ठरविले आणि उध्यापासून हे रुग्णालय लोकांचे आणि रुगणाच्या सेवेसाठी सुरु होत आहे.

माण तालूक्यातील कोरोना रुग्नाची होणारी हेळसांड आणि मिळत नसलेले योग्य उपचार, ऑक्सिजन बेडची कमतरता आणि वाढते मृत्यूचे प्रमाण हे सर्व पाहता माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून व दहिवडी नगरपंचायत दहिवडी याच्या प्रयत्नातून दहिवडी येथील मुलीचे वसतिगृहात उध्या दि. 26 एप्रिलपासून “कोविडं सेंटर” सुरु होत असून या सेंटर मध्ये 25:2 बेड आणि 50 आयसोलेशन बेड तयार करणेत आले आहेत.
याची पाहणी स्वतः आमदार जयकुमार गोरे,दहिवडी विभागाचे प्राताधिकारी शैलेश सूर्यवनशी,माणच्या तहसीलदार बाई माने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ कोडलकर,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी केली असून उध्यापासून हे “कोविडं सेंटर” रुग्णासाठी उपलब्ध होत आहे असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले तालूक्यातील रुगणाची या सेंटर मुळे होणारी धावपळ थाबणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED