माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांच्या मागणीची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल

23

🔹हिंगणघाट येथे जम्बो कोविड-१९ रुग्णालय सुरू करण्या संदर्भाततील विषय

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.२५एप्रिल):-वर्धा जिल्ह्यातील दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढती वर आहे. हिंगणघाट तालुक्यात सुद्धा रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे हिंगणघाट येथील शहराबाहेर असलेल्या नागपूर रोड वर दोन माळयात पंधरा हजार स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम असलेलं मातोश्री सेलिब्रेशन हॉल मध्ये जम्बो कोविंड सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हा प्रशासनाला केली होती. त्या मागणीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी दिलेल्या पत्राची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण च्या अर्चना मोरे यांनी पत्र देत नवीन कोविड-१९ रुग्णालय सुरू केल्यास त्या रुग्णालयाकरिता ऑक्सिजन ,वैद्यकीय मनुष्यबळ व अन्य आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबत आपण केलेल्या नियोजनाससह सदर प्रस्ताव सादर करण्यात यावा असे कळविले आहे यावर प्रा.राजू तिमांडे यांनी पत्र लिहित भविष्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नियोजन करणे आवश्यक आहे ज्या दवाखान्यात डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध नाही त्याची व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागाला कळवून त्वरित भरती करण्यात यावी तसेच डॉक्टर, ऑक्सिजन अन्य आवश्यक वैद्यकीय सोयी या शासकीय धोरणानुसार आपल्याला पुरवाव्या लागेल. रुग्णांची होत असलेली हेळसांड थांबेल व रुग्णांना हिगणघाट येथेच योग्य उपचार मिळेल असे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.