डॉ.विवेक यशवंत धुपदाळे यांची निवड

27

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.26एप्रिल):-राज्यातील विविध केन्द्राना,संस्थाना Patents बाबत धोरण, कार्यक्रमाचे नियमन करणे यासाठी कायदा सल्लागार म्हणून डॉ धुपदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.विवेक यशवंत धुपदाळे,हे शिवाजी विद्यापीठ येथे विधी अधि विभाग येथे विभाग प्रमुख, म्हणुन कार्यरत आहेत.त्यांची बौद्धिक संपदा अधिकार(Intellectual Property Rights)च्या माध्यमातून Patents बाबत कायदा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विद्यापीठामधील व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थांच्या प्राध्यापकांना IPR Patent मिळवून देण्यास कायदेशीर सल्ला डॉ. धुपदाळे यांच्यामार्फत मिळणार आहे.

सर्व प्राध्यापकांना ही “One Window” सेवा शिवाजी विद्यापीठ देणार आहें. सदर सेवेचा उद्देश असा की शिवाजी विद्यापीठ व संलग्न असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये जास्तीत जास्त Patents मिळावे आणि विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडावी. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना IPR सल्लागार म्हणून तयार करणे हादेखील एक प्रयत्न आहे.

डॉ.धुपदाळे हे बौद्धिक संपदा अधिकार (IPR) विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी बौद्धिक संपदा अधिकार (IPR) विषयाचा अभ्यास करून नावलौकीक मिळवतात.

येणाऱ्या भविष्यात बौद्धिक संपदा अधिकार (IPR) विषयाचा दबदबा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणार असून त्याबाबत आपल्या शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी , प्राद्यापक यांनी पुढाकार घेऊन नवनवीन विषयात पेटंट मिळवावे अशी डॉ. धुपदाळे यांची इच्छा आहे.
________
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या विधी अधिविभागास संपर्क साधावा. विधी अधिविभागात बौद्धिक संपदा अधिकार (IPR) विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देण्यात येते.