चांदवड येथील टायगर ग्रुप कार्यकर्ते दिवस असो वा रात्र स्मशानात जाण्यास तयारच

23

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.26एप्रिल):-चांदवड शहरात सध्या कोरोना योद्धा म्हणून अनेकांची नावे घेण्यात आली,मात्र नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचा टायगर ग्रुप खरा कोरोना योद्धा म्हणून दुर्लक्षितच राहिला. चांदवड शहरात उपजिल्हा रुग्णालय परिसरात कोरोना सेंटर मधून किंवा कोरोनाच्या आजाराने मृत झालेल्या रुग्णास घरून स्मशानभूमीत नेण्यास चांदवड नगरपरिषदेतील हा टायगर ग्रुप कोणत्याही वेळी तयारच असतो.काही वेळा तर असे प्रसंग आले आहेत की रात्री २ वाजून ३५ मिनिटानी किंवा पहाटे ४ वाजता सुद्धा मृत व्यक्तीचा मृतदेह स्मशानात नेण्याची वेळ आली मात्र ग्रुप डगमगला नाही.

या ग्रुपमध्ये कोविडयोद्धा यशवंत बनकर (मुकादम) ,खंडू वानखेडे, लक्ष्मण जाधव, प्रभाकर अस्वरे.म्हसु गायकवाड,संजय गायकवाड, संतोष अण्णा कापसे कर्मचारी यांचा समावेश आहे.
सदर ग्रुपचे यशवंत बनकर व खंडू वानखेडे यांचे दोन अति वृद्ध व्यक्तीस भर उन्हात पाणी पाजताना व खाऊ घालतानाचे व्हिडिओ श्रमिक वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुनील आण्णा सोनवणे यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा ग्रुप अधिक चर्चेत आला असून आम्हास दिलेली जबाबदारी अतिशय सौजन्याने व डोक्यावर बर्फ ठेऊनच पार पाडावी लागत आहे असे टायगर ग्रुप चे सदस्य श्री यशवंत बनकर यांनी बोलताना सांगितले.या ग्रुपला मुख्याधिकारी श्री अभिजित कदम ,स्वच्छता अभियंता श्री सत्यवान गायकवाड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.