उजनीचे ५ टीएमसी पाणी पालकमंत्र्यांना अडचणीत आणनार

🔹अतुल खुपसे-पाटीलांनी कुर्डूवाडीत बोलावली शेतकरी नेत्यांची बैठक

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.26एप्रिल):-राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्हयातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यात घेऊन गेल्याची बातमी पुण्यनगरी या दैनिकाला प्रसिद्ध झाली आणि शेतकऱ्यांसाठी जीव धोक्यात घालणारा नेता पुन्हा आक्रमक झाला. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आधी बारामती कर यांनी पळवले त्यानंतर आत्ता इंदापूर कर पळवत आहेत.
मग माझ्या सोलापूर जिल्हयातील शेतकरी माय – बापांनी काय उपाशी झोपायचे का? असा खडा सवाल शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी उपस्थित केला, आणि गडी रिंगणात उतरला. अतुल खूपसे यांना रिंगणात पाहून याआधी विरोध करणारे नेते देखील समर्थन करू लागले. आणि पाणी पळवनाऱ्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची झोप उडविली.

लढा आमच्या हक्काचा हे ब्रीद घेऊन आमचे पाणी इंदापूर तालुक्यात गेलं नाही पाहिजे असा आक्रोश करत, दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्याची तिरडी बनवून आंदोलन केले आणि या आंदोलनाने झोपलेले नेते जागे झाले. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत मी लढत राहणार, हे तिरडी आंदोलन करून मी शांत नाही बसणार, मला राजकारण करायचे नाही. मात्र माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे.दत्तात्रय भरणे आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत. मात्र माझ्या शेतकऱ्यांपुढे कोणता मित्र आणि कोणता पुढारी मोठा नाही. सोलापूर जिल्ह्यातील युवकांनो एक व्हा, शेतकरी नेत्यांनो एकी करा, माझ्या या लढ्यात सामील व्हा. असे आवाहन अतुल खूपसे यांनी सोलापूर जिल्हयातील युवकांना व नेत्यांना केले आहे.

दि – २७ एप्रिल २०२१ रोजी कुर्डूवाडी या ठिकाणी सोलापूर जिल्हयातील युवक कार्यकर्त्यांची बैठक अतुल खूपसे यांच्या मार्गदरशना खाली घेण्यात येणार आहे.या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील मुख्य शेतकरी नेते उपस्थीत असणार आहेत. कार्यकर्त्यांना मंगळवारी बरोबर ११ वाजता उपस्थित राहावे. या संबंधी पुढील नियोजन व आंदोलना बाबत सविस्तर चर्चा होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन अतुल खूपसे यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED