भय इथले संपत नाही….

27

आजचा प्रत्येक दिवस भयावह व वेदनादायक उजळत आहे.देशातील कोविड-१९ च्या महामारीने गंभीर परिणाम निर्माण केले आहेत.पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे.एक वर्षापासून सुरू झालेल्या भयग्रस्त वातावरणाने मानवीय चेहरे चिंतातूर झाले आहेत.
महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेने अक्राडविक्राड रूप धारण केले अाहे. आरोग्य यंत्रणा व प्रशासकिय यंत्रणा युध्दपातळीवर काम करत असतांना कोरोना बाधित रूग्णांचा आकडा कमी न होता सातत्याने वाढत आहे.सरकारी व खाजगी दवाखाण्यावर प्रचंड ताण पडत आहे.आँक्सिजन व औषधाच्या कमतरतेने हकनाक मूत्यु होत आहेत.नियोजन करूनही नियोजनाची वाट लागत आहे.डॉक्टर ,नर्स,वार्डबाय,पोलिस , शिक्षक,आशा वर्कर,व इतर कर्मचारी प्रयत्नाची पराकाष्टा करीत आपले कर्तव्य पार पाडत आहेत.पण अपुऱ्या संसाधनामुळे ते काही करू शकत नाही.एक वर्ष राजकारण्याच्या आखाड्यात मशगुल असलेल्या नेत्यांना काय कराव समजत नाही.या महामारीने सामान्य माणसाचे आधारस्तंभ गळून पाडले आहेत.ऑक्सिजन न मिळालेल्या मानवाचे आर्त आक्रंदनाने नातलग गलबलून जात आहेत.पेटणाऱ्या चिंतामधून आकाश व मानवी मन बधिर झालं आहे.

माणूस निसर्गाला वश करायला निघाला त्या मानवाला या वायरसने हैरान केले आहे.मानवाच्या चुकिची किंमत मानवाला मोजावी लागत आहे.आरोग्य यंत्रणेत राजकारण शिरल्याने आरोग्य यंत्रणा निष्क्रिय झाल्या होत्या .खाजगी दवाखाण्यामुळे सरकारी दवाखाणे कमकुवत करण्यात आले होते.या आजारातील काही लोकांना खाजगी दवाखाण्यात घेतले जाते पण सामान्य माणसाला अँडमिट केले जात नाही.गरीब व असाह्य माणूस मरणाच्या दारात रोज उभा आहे. बेड व ऑक्सिजन अभावी तळफळून मरणारे माणसे देशाचे नागरिक नाहीत का..? त्याच्या जीवनाची हमी संविधानाने दिली असतांना योग्य सुविधा न पुरवणे वर्तमान सरकारचे अपयश नाही का..?
महाराष्ट्र या महामारीने पुरा होरफळून निघत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना फोन करतांना त्यांचा फोन उचलला जात नाही.सत्तेच्या मदाने ग्रासलेल्या देश नेतृत्वाला फक्त निवडणूक जिंकणे एवढेच माहीत आहे.लोकांचे प्राण गेले तरी त्याच्यावर कोणताही परिणाम जानवत नाही.ही गोष्टच मनाला चिड आणणारी आहे.

महाराष्ट्रात नाशिक इथे झाकिर हुसेन रुग्णालयात चोवीस माणसाचा आँक्सिजन गळतीने मूत्यु झाले याला जबादार कोण ?मुबंईतील विजय वल्लभ कोविंड सेंटरला आग लागून चौदा रुग्ण मरण पावले याला जबादार कोण.?भंडारा जिल्ह्यात अशी घटना घडूनही प्रशासन सतर्क का होत नाही.एखादी समिती गठीत करूण काही लोकांवर कार्यवाही करून अशा घटना थांबवता येणार नाही तर काही ठोस निर्णय घ्यावे लागतील.मृत्यु पावलेल्या लोकांना मदत केली म्हणजे संपले असे न करता अशी घटना घडू न देणे हाच यावरील खरी उपाययोजना आहे.
आज दवाखाण्यातील नातेवाईकांचा आक्रोश पाहून मनं विदिर्ण होते.आँक्सिजनसाठी रस्तोरस्ती धावणारे माणसे आस लावून मनाला धिर देत आहेत.या महामारीत अनेकांनी आपल्याला गमावलं आहे.जर आजही आपण वेळेवर योग्य उपाययोजना केली नाहीतर कोरोना त्सुनामीचा महाप्रलय देशाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही.आता शासना बरोबर जनतेनेही सावध व्हायला हवे.या आजाराची योग्य खबरदारी घेतली तर लवकर बरे होता येते.

स्मशानातील पेटणाऱ्या चितांच्या काळवडतेला कमी करण्यासाठी लोकांनी लढलेच पाहिजे.शहरातील व गावातील भयग्रस्त मनाला नवी ऊर्जा द्यायला हवी.तरूणाईला व सर्व लोकांना वाचवायला नवे मार्ग चोखाळायला हवे.
कोविड-१९ वायरसने नवे डबल म्युटेशन परावर्तित केलेले आहे.आज घरातील सर्वंच मंडळी या आजाराने प्रभावित होत आहेत.त्यासाठी सर्वानी नवी रणनीती आखावी.मानवी धागे या आजाराने तोडले आहेत.कठीण प्रसंगी धावून जाणारा माणूस थोडा विचलित होत आहे.रोजचा उगवणारा नवा दिवस मानवी काळजाला छिन्नविछिन्न करत आहे.आता तरी भारतीयांनी राजकारण सोडून देशाचा व महाराष्ट्राचा विचार करावा.ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना करू द्या .शेवटी त्यांची नाडी आपल्याच हातात आहे हे विसरू नका.काळाबाजर करणाऱ्या मवाल्यांना मोठी सजा व्हायला हवी.राजकारणातील बिनमेंदूच्या खोगीरभर्तीचा नायनाट करावचं लागेलं.मरणाऱ्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवायला हवी.

देशातील सर्व माणसे समान माणून सर्वांना औषधोपचार करावा.वेळेवर ऑक्सिजन व इंजेक्शन मिळण्यासाठी युध्दपातळीवर काम करावे.सैनिकांची जर मदत लागली तर ती सरकारने घ्यायला हवी.आज राजकारणी जमीन सोडून आकाशात विहार करत आहेत.त्यांना जमीनीवर आणण्यासाठी साऱ्या देशानी एक व्हाव. देशातील मानवाने जातीय व धार्मिक भेद बाजूला सारून या महामारीला आटोक्यात आणावे.जर भारतात मंदिरासाठी आंदोलन केले नसते तर आज त्यातून मोठे हॉस्पिटल उभे राहिले असते.त्यातून कितीतरी लोकांचे प्राण वाचू शकलो असतो.नव्या संसद भवन बांधण्याचे थांबवले असते तर तो पैसा ऑक्सिजन निर्मितीसाठी वापरता आला असता.बांधवानो आतातरी डोळे उघडा आपले . आपल्या भविष्य काळासाठी काय हवयं यावर चिंतन करा.मंदिर -मजिद़ यापेक्षा माणूसिकचं नवं आरोग्य विहार निर्माण करू या.राजकारण्याला जाब विचारून त्यांची बोलती बंद करू या.

लसीकरणासाठी सर्व नागरिकांनी तयार व्हाव.वैज्ञानिक ज्ञान आत्मसाद करून नवं जीवन फुलवावं.मरगळलेल्या मनाला नवी ऊर्जा देण्यासाठी स्वतःला नियमानी बांधून घ्यावे. ही महामारी थांबण्यासाठी सकल मानवाने सहकार्य करावे.नवा संविधानिक मार्ग निवडूण भय इथले संपता येईल हाच योग्य मार्ग आहे.दुसरा चांगला मार्ग नाही.जर हा मार्ग आपण सोडला तर भय इथले संपणार नाही.तुर्ताश थांबतो..!

आक्रोशणाऱ्या साऱ्या मनाला
नवं उभारी देऊ या।
कोविड-१९ ला हरविण्यासाठी
स्वतःला तयार करू या ।
आरोग्यसंदेश मनी घेऊनी
भय इथले संपवू या ।
नवा मानवतावादी लोकशाही
भारतदेश वाचवू या ।

✒️लेखक:-संदिप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००