कोरोनाने मृत्त इसमावर ग्रामपंचायत ने केला अंतिमसंस्कार

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

नेरी(दि.26एप्रिल):– चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामपंचायत विहिरगाव गावात एक युवक कोरोना मुळे स्वता:चे घरिच मृत्त झाला.ही माहिती गावातील सरपंच ग्राम पंचायत सदस्य आशा वर्कर संगणक परिचालक यांना देण्यात आली.तीन दिवसांपूर्वी वडिलांचा आणि आज मुलाच मृत्यू झाल्यामुळे आणि सगळीकडे कोरोना चा कहर सुरू असुन जनता कफ्युँ असल्याने व गावातील लोक आणि नातेवाईकही तयार नसल्याने अत्यंसस्कार करणार कोण असा प्रश्न पडला असता सामाजिक दायित्व स्विकारून विहिरगाव येथील सरपंच उपसरपंच यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत सदर इसमाचा अंत्यसस्कार केला.

सरपंच सौ. शितल प्रवीण मुंडरे उपसरपंच मधुकर गजभिये सदस्य विकास बारेकर व सचिव नैताम साहेब, संगणक परिचालक प्रवीण मुंडरे पाणी पुरवठा कर्मचारी हेमराज ठवरे गावातील व्यति आशिक सुधाकर नन्नावरे व मृत्यू व्यक्ती चे भाऊ सूर्यकांत गजानन मेश्राम उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED