चंद्रपूर जिल्ह्यात (दि.26एप्रिल) रोजी 24 तासात 1300 कोरोनामुक्त,1529 कोरोना पॉझिटिव्ह तर 23 कोरोना बधितांचा मृत्यू

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.26एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 1300 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1529 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 54 हजार 369 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 37 हजार 715 झाली आहे. सध्या 15 हजार 843 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 59 हजार 554 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 478 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील श्यामनगर परिसरातील 58 वर्षीय पुरुष, श्रीराम वार्ड येथील 47 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 65 वर्षीय महिला व 67, 50 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 58,70 व 72 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील 45 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी वार्ड येथील 41 वर्षीय पुरुष, चुनाळा येथील 65 वर्षीय पुरुष,चिमूर तालुक्यातील बोथली येथील 37 वर्षीय महिला, खडसंगी येथील 70 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, व 47 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 67 वर्षीय महिला व 51 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्ड येथील 62 वर्षीय पुरुष, देलनवाडी येथील 65 वर्षीय पुरुष ,गडचांदूर येथील 40 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील 58 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा तर गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 811 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 747, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1529 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 621, चंद्रपूर तालुका 61, बल्लारपूर 60, भद्रावती 138, ब्रम्हपुरी 112, नागभिड 27, सिंदेवाही 38, मूल 73, सावली 20, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 43, राजूरा 31, चिमूर 73, वरोरा 120, कोरपना 59, जिवती 21 व इतर ठिकाणच्या 21 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 13 मृत्यूसह आज(26 एप्रिल) 272 नवीन कोरोना बाधित तर 447 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.26एप्रिल):-आज जिल्हयात 272 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 447 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 18917 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 14246 वर पोहचली. तसेच सद्या 4336 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 335 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 13 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि.गडचिरोली येथील 70 वर्षीय पुरुष, रा. सोमलवाडा जिल्हा नागपूर येथील 49 वर्षीय महिला, रा. सालईटोला ता. कुरखेडा जि.गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता.धानोरा जि. गडचिरोली येथील 66 वर्षीय पुरुष, रा. नवेगाव गडचिरोली येथील 38 वर्षीय पुरुष, जि. चंद्रपूर येथील 38 वर्षीय पुरुष, रा. इंदिरा वार्ड ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील 48 वर्षीय पुरुष, रा. बल्लारशा जि. चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष, रा.हनुमाननगर ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष, रा. स्नेहानगर गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 54 वर्षीय पुरुष, रा.जेप्रा, गडचिरोली येथील 41 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.31 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.92 टक्के तर मृत्यू दर 1.77 टक्के झाला.

नवीन 272 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 171, अहेरी तालुक्यातील 9, आरमोरी 27, भामरागड तालुक्यातील 8, चामोर्शी तालुक्यातील 14, धानोरा तालुक्यातील 9, एटापल्ली तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 11 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 6 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 447 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 188, अहेरी 33, आरमोरी 28, भामरागड 5, चामोर्शी 24, धानोरा 8 , एटापल्ली 21, मुलचेरा 14, सिरोंचा 11, कोरची 32, कुरखेडा 43, तसेच वडसा येथील 40 जणांचा समावेश आहे.
****