कवींचे कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा माणगाव माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न

23

✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बीड(दि.26एप्रिल):- नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचे संस्थापक अध्यक्ष कवी वादळकार प्रा. राजेन्द्र सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कवींचे कॅलेंडर चे प्रकाशन माणगाव जिल्हा रायगड येथे माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्यास तन्मय यादव , सचीन शेठ, रायगड भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार सलीम शेख, कोमसाप शाखा माणगावचे कार्यवाहक रूपेश शेठ, वजीर चौगुले व कट्टर नक्षञ कवयित्री सायराबानू चौगुले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी या आगळ्या वेगळ्या कल्पनेचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आधारित सर्व नियमांचे पालन करून करण्यात आला.

कवींचे कॅलेंडर सन २०२१ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक कवींच्या कविता त्यांचे नाव व फोटो सह विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या महिन्यात छापण्यात आल्या आहेत .तसेच त्या कवींच्या वाढदिवसांच्या तारखेला वाढदिवसाच्या शुभेच्छा ठळक अक्षरात दिल्या आहेत. या दिन दर्शिकेमध्ये कवयित्री सायराबानू चौगुले माणगाव रायगड यांची ‘माणुसकी’ ही कविता त्यांचा वाढदिवस असलेल्या डिसेंबर महिन्यात छापलेली आहे. निवडक कवींच्या विविध विषयांवर असलेल्या या सर्व कविता वाचनीय व आशय संपन्न आहेत.

हे कॅलेंडर नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे आयोजित अनेक अखिल भारतीय संमेलनाच्या क्षणचित्रांनी नटलेले आहे. नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे हे कवींचे हक्काचे व्यासपीठ आहे. त्याद्वारे अनेक संमेलने आयोजित करून नव्याजुन्या कवींना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करते. त्याचबरोबर ‘ कवी जगताचा धनी ‘ या काव्यमंच च्या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रत्येक कवीच्या विचारांचा व कवींचा सन्मान करते सध्या चालू असलेल्या कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व मानव घरामध्ये बंदीस्त असतानाही नक्षत्राचं देणं काव्यमंच “काव्यातील नक्षत्र ईबुक” चा अनोखा उपक्रम राबवत आहे. जेणेकरून साहित्यिकांचे मन आणि मेंदू गुंतून राहील .यासाठी नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे समूहावर दर आठवड्याला एक विषय दिला जातो .या विषयावर आलेल्या सारस्वतांच्या कवितांचे दरमहा “काव्यातील नक्षत्र ईबुक” प्रकाशित केले जाते.

असे साहित्यिकांसाठी निस्वार्थपणे अहोरात्र झटणाऱ्या व नवनवीन कल्पना राबविणाऱ्या नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे चे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे कवींचे कॅलेंडर महाराष्ट्रभरच्या कवींमार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचले आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे.या उपक्रमाचे व कार्यक्रमाचे नियोजन कविवर्या सौ.सायराबानु चौगुले यांनी केले.उपस्थिताची अभिनव उपक्रमाचे स्वागत केले.