ग्रामपंचायत चिखली खुर्द अंतर्गत पाटागुडा गावातील वाचणालयाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या

🔸रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे यांची मागणी

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.26एप्रिल):- चिखली खुर्द अंतर्गत पाटागुडा गावातील वाचनालयांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर ३५ कादंबऱ्या,३ नाटके,११ लोकनाट्य,१३ कथासंग्रह,७ चित्रपटकथा.अशी अनेक प्रकारचे बहुजन समाजाला परिवर्तित करणारे साहित्य अण्णाभाऊंनी निर्माण केली आहे. छत्रपती शिवरायांना रशियात पोहोचवणारे लोकशाहीर आहेत.महाराष्ट्रात झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते महानायक होते. त्यांनी लिहिलेल्या फकीरा सारख्या अनेक कादंबऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आहेत.

अण्णाभाऊंनी सारस्वतात उपेक्षितांना मानाचं स्थान दिलं.भटके,रायरंद,गारुडी,माकडवाले,दरवेशी,पोतराज,तमासगीर,लमाण यांच्या शापित जीवनावर कादंबरी लिहिणारा अशा पहिल्या साहित्यिकाचे पाटागुडा येथिल वाचणालयाना नाव देण्यात यावे अशी मागणी रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे यांनी ग्रांम पंचायत चिखली खुर्द, गटविकास अधिकारी जिवती, तहसिलदार साहेब जिवती, जिल्हा अधिकारी साहेब जिल्हा चंद्रपूर, मुख्यधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कडे मागणी केली आहे,

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED