राज्य सरकारने करोणासदृष्य परिस्थितीत नियोजनासाठी दिलेला एक कोटी रुपये निधी आमदार जयकुमार रावल यांनी लोकहितासाठी वापरावा : जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे-पाटील

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.26एप्रिल):- राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सर्व लोकप्रतिनिधींना करोणा काळात रुग्णांचे हाल होऊ नयेत त्यांची उपचारासाठी योग्य ती सोय व्हावी ऑक्सिजन व्हेंटिलेटर विलगीकरण कक्ष यासारखे खबरदारीचे नियोजन करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री यांनी अधिकचा एक कोटी रुपये निधी आमदारांना दिला आहे हा निधी फक्त covid-19 च्या नियोजनासाठी वापरण्यात यावा असा त्यामागचा हेतू आहे.

शासनाच्या आलेल्या निधीच्या वापरासंदर्भात शिंदखेडा तालुक्यातील लोकप्रतिनिधी जयकुमार रावळ यांच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक समज गैरसमज आहेत तरी अशा काळात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दिलेल्या या निधीचा covid 19 च्या रूग्णांसाठी योग्य वापर किमान आता तरी होऊ द्या ही मागणी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे करीत आहोत , ही वेळ राजकारणाची नाही व जनतेच्या टाळू वरच लोणी देखील खायची ही वेळ नाही म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे जयकुमार रावल यांनी महाविकास आघाडी सरकार ने जनतेसाठी दिलेला हा पैसा शुध्द हेतुने वापरावा म्हणून प्रशासनास अवगत करत आहोत

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED