आ. राजेश ऐकडे यांनी मलकापूर येथील शासकीय कोविड सेंटरची केली पाहणी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मलकापूर(दि.26एप्रिल):- येथील शासकीय कोविड सेंटरची आमदार ऐकडे यांनी पाहणी केली,वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता,बेडची संख्या वाढवावी सर्व बेडचे अाक्सिजन बेड मध्ये रूपांतरित करण्यासाठी ऑक्सिजन सेंटर लाईन तात्काळ बसवावी,रुग्णांना आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्या तसेच कोविड सेंटर चा विस्तार करण्यासाठी इमारतीची आवश्यक ती दुरुस्ती त्वरित करण्या बाबत सार्वजनीक बांधकाम विभागास आमदार राजेश ऐकडे यांनी सूचना केल्या.

यावेळी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे मुख्य प्रशासक डॉ.अरविंदजी कोलते,मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी, मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.राजूभाऊ पाटील,नगरसेवक श्री.राजेंद्र वाडेकर,मलकापूरचे उपविभागीय अधिकारी (महसूल)श्री.मनोज देशमुख, मलकापूरच्या तहसीलदार कु.स्वप्नाली डोईफोडे, मलकापुर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नाफडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अझर,डॉ.जैन मॅडम,सा.बा. विभागाचे शाखा अभियंता श्री.पडघान,मलकापूर विधानसभा मतदारसंघ चे सोशल मीडिया चे अध्यक्ष श्री.समाधान इंगळेसर,नरवेल सर्कल प्रमुख श्री.गिरीश कोलते,श्री. प्रामुख्याने उपस्थित होते..

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED