तहसीलदारांच्या आवाहनाला युधाजित पंडीत यांचा प्रतिसाद

🔹कोरोनाग्रस्तांसाठी गेवराई रुग्णालयाला साहित्याची केली मदत

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)

गेवराई(दि.27एप्रिल):-तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरणाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांच्या उपचारासाठी गेवराईतच सोय करण्यात येत आहे. परंतु त्यासाठी साहित्याची गरज असल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी कळवताच शिवसेना जिल्हा समन्वयक तथा माजी जि प स सभापती युधाजित पंडित यांनी रुग्णांसाठी लागणारे साहित्य तात्काळ स्वतः जाऊन गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पोहोच करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.गेवराई तालुक्यात दिवसेंदिवस कोरुना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी शहरातील तीन कोव्हीड सेंटर आणि 2 डी सी एस सी सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत.

या सर्व सेंटरची देखभाल करण्यासाठी आणि रुग्णांना अद्यावत सेवा पुरविण्यासाठी विविध साहित्याची गरज भासत होती. याबाबत तहसीलदार सचिन खाडे यांच्याकडून माहिती समजताच, शिवसेनेचे माजी जि प सभापती युधाजित पंडित यांनी तात्काळ गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. येथील उपचार करणारे डॉक्टर आणि रुग्ण यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी आणलेले, दवाखाना व रुग्णांसाठी लागणारे गरजेचे साहित्य तहसीलदार सचिन खाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ महादेव चिंचोले यांच्याकडे सुपूर्द केले. आणखी काही मदत लागल्यास केव्हाही सांगा ती दिली जाईल, अशी ग्वाहीही यावेळी जि प सदस्य युधाजित पंडित यांनी दिली. याप्रसंगी मनसे जिल्हाप्रमुख राजेंद्र मोटे, कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे, डॉ राजेश शिंदे, डॉ सराफ, सुनील पंडित आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED