राज्य माहिती आयोग अमरावती यांच्याकडुन माहिती वेळेत न पुरविल्यामुळे जनमाहिती अधिकारी यांना दंड

37

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अमरावती(दि.27एप्रिल):- माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जन माहिती अधिकार्‍याने 30 दिवसात माहिती न पुरविल्यामुळे त्या जन माहिती अधिकार्‍यावर दंड करण्याचे आदेश राज्य माहिती आयोग अमरावती यांनी दिले आहेत.सदर कारवाहीमुळे जन माहिती अधिकार्‍यामुळे खळबळ उडाली आहे .शेगांव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य सरचिटणिस श्री. भिकाजी मोतीराम वरोकार यांनी सन 2017 मध्ये माहिती अधिकार कायदया अंतर्गत तलाठी कार्यालय नायगांव ता.नांदुरा जि. बुलढाणा येथील कार्यालयास माहिती मागीतली होती.

माञ जन माहितीअधिकारी यांनी माहिती न दिल्यामुळे श्री .भिकाजी वरोकार यांनी प्रथम अपिल दाखल केल्यानंतर अपिलीय अधिकारी यांनी माहिती लवकरात लवकर पुरविण्याचे आदेश देवुन सुध्दा माहिती न पुरविल्यामुळे श्री भिकाजी मोतीराम वरोकार यांनी राज्य माहिती आयोग अमरावती यांच्याकडे दितीय अपिल दाखल केले होते.

या अर्जावर सुनावणी होवुन आयोगाने गंभीर दखल घेत राज्य माहिती आयुक्त अमरावती श्री .संभाजी सरकुंडे यांनी तात्कालीन जन माहिती अधिकारी श्री. एस .व्ही. पेंदोर यांना 12000 हजार रुपये दंड व विधमान जन माहिती अधिकारी कु. वैशाली एस. भुसारी यांनी 25000 हजार रुपये दंड केला.सदर रक्कम जन माहिती अधिकारी यांच्या पगारातुन वसुल करुन चलानद्वारे माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या संबधीत लेखाशिर्षामध्ये जमा करावी .व तसा अनुपालन अहवाल चलान सह आयोगास सादर करावा.असे आपल्या आदेशात नमुद आहे