आतातरी देव-धर्म सोडा अन विज्ञानाची कास धरा !

सध्या सुरू असलेली कोरोनाची ‘साथच’ नव्हेतर आजपर्यंत आलेल्या सर्व नैसर्गिक आपत्ती व रोगराई ने नेहमीच देव-धर्माच्या अस्तित्वावर पाणी फिरवलंय किंबहुना देव-धर्माचं अस्तित्वच निकाली काढलंय..तरी माणूस नावाचा हा प्राणी काही सुधारत नाही…

मानव प्राण्याचा इतिहास पाहता देवाधर्माच्या संकल्पनेने माणसांचेच नव्हेतर सोबतच्या जनावरांचे व निसर्गाचेही अपरिमित असे नुकसानच केलेय…

मनःशांतीसाठी वा नैतिकता जपण्यासाठी म्हणा देवधर्मावरील श्रध्दा हिच घात करत आलीय कारण श्रध्देतच तर अंधश्रध्देची बीजं रुजलेली असतात…

सुरुवातीस स्वतःपुरता मर्यादित सहिष्णू देव-धर्म कधी कट्टर होवून माणसाला रस्त्यावर आणतो हे त्याचंत्यालाच कळत नाही…अन एकदा का कट्टरता रस्त्यावर उतरली की मग समोरचा ही आपल्यासारखाच हाडामासाचा माणूस आहे याची जाण हरपली जाते…

मोजक्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न अख्या मानवजातीला मानसिक गुलामीच्या गर्तेत ढकलतोय…जनावरापासून उत्क्रांत पावलेल्या माणसाला पुन्हा जनावर बनवतोय…

भूतलावरुन देवा-धर्माचं संपूर्ण उच्चाटन झाल्याशिवाय मानव कल्याण शक्य नाही…

म्हणूनच…

येडसरपणा सोडा…विज्ञानाची कास धरा….!

✒️लेखक:-मिलिंद भवार(पँथर्स)9833830029

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED