ग्रा.प.निवडणुकिच्या कारणावरुन बौद्ध व मातंग समाजावर खुनी हल्ल्याचे प्रमाण वाढले- दादासाहेब शेळके

36

✒️विशेष प्रतिनिधी(बलवंत मनवर)

परभणी(दि.27एप्रिल):-जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील भोसा या गावी भीमसैनिक अंकुश झोडपे यांच्यावर जातीयवादी गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत भीम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादासाहेब शेळके यांनी मानवत पोलीस स्टेशन चे पी.आय.स्वामी यांच्याशी संपर्क करून आरोपींविरोधात कडक कार्यवाही करून त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले* *ग्रा.प.निवडनुकीत तू आम्हाला मतदान केले नाही व तू आमच्या विरोधात फिरला या शुल्लक कारणावरुंन मराठवाड्या तील नांदेड जिल्हा मधील हिमायतनगर तालुक्यातील कांडली या गावातील* *जातीयवादी लोकानी मातंग व बौद्ध बांधवांवर खुनी हल्ला केला असून त्यात मातंग व बौद्ध बांधव गंभीर जखमी झाले आहेत.

शेवटी भीम टायगर सेनेच्या आंदोलनाच्या इशारा मुळे तामसा पोलीस स्टेशन येथे जातीय वाद्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच* *मराठवाड्यातील परभणी जिल्हा मधील मानवत तालुक्याती ल भोसा येथील अंकुश जोडपे या भीमसैनिकावर गावातील आज मनुवाद्यानी खुनी हल्ला केला आहे. अंकुश जोडपे हा गंभीर जखमी झाला आहे* *त्यांना शासकीय हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेले आहे. भिम टायगर सेना परभणी जिल्हा प्रमुख अर्जुन नाना पंडित यांनी तात्काळ जखमी ,त्यांचे नातेवाईक व संबंधीत पोलिस स्टेशन याना मोबाईलद्वारे संपर्क साधला असून तात्काळ ते परभणी येथील हॉस्पिटलला जखमी अन्कुश ची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहेत.

तसेच अर्जुननाना याणी भोसा येथील प्रकरणाची माहीती भिम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांना दिली असुन दादासाहेब शेळके याणी तात्काळ मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वामी साहेब यांना मोबाईल द्वारे संपर्क केला असून फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आपण तर स्वतः जबाबदार राहाल असा इशारा तेताच मानवत पो.स्टे.चे p.s.i.हे अन्कुश जोडपे यांचा जवाब घेण्यासाठी परभणी येथे रवाना झाले आहेत.आणि म्हणून सध्या च्या परिस्थितीचा विचार करता देशाबरोबर महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठे बौद्ध, मातंग व अनुसूचित जाती वर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले असून त्यांना वेळीच आवर घालण्या साठी सगळ्या आंबेडकरी अनुयायांनी हातात हाथ घालुन मनुवादयाच्या बूडा खाली धुर काढण्यासाठी तयार राहण्याची गरज असल्याचे शेवटी भिम टायगर सेना प्रमुख दादासाहेब शेळके म्हणाले*