ऑक्सिजन उपलब्ध झाल्याबरोबर दिली जाईल १५ बेडची परवानगी

22

🔹हिंगणघाट येथे अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर व मरोठी हॉस्पिटलला ज्यादा १५ बेडची परवानगी देण्यासंबंधी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी दिले पत्र

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.27एप्रिल):-अरीहंत क्रिटिकल केअर सेंटर व मरोठी हॉस्पिटल हिंगणघाट येथे कोविड सेंटर सुरू असून जादा १५ बेडची परवानगी देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी अर्चना मोरे निवासी जिल्हाधिकारी तथा मु.का.अ. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा यांना पत्राद्वारे मागणी करण्यात आली.अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर व मराठी हॉस्पिटल हिंगणघाट यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १९ एप्रिल पासून कोविड सेंटर सुरू झाली आहे. त्या दवाखान्यात १० बेडची व्यवस्था असून सभोवतालच्या परिसरात कोरूना मोठ्या झपाट्याने वाढत आहे वाढत्या कोरोना संक्रमणामुळे कुराणाचे उपचार करणे कठीण झाले आहे.

या कोविड सेंटरमध्ये रूग्णांसाठी जादा १५ बेडची परवानगी द्यावी. या कोविड सेंटरमध्ये डॉ.मरोठी आणि त्यांची टीम काम करीत आहे जादा बेडची परवानगी दिल्यास परिसरातील कोविड रुग्णांना उपचार करता येईल.निवासी अधिकारी तथा मु.का.अ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धाच्या अर्चना मोरे मॅडम यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून हिंगणघाट येथील कोविड सेंटर मध्ये १५ बेडची बेड देण्यासंबंधाने चर्चा झाली. ऑक्सीजन उपलब्ध झाल्याबरोबर ज्यादा १५ बेडची परवानगी अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर व मरोठी हॉस्पिटल हिंगणघाट यांना देण्यात येईल असे सांगण्यात आले.
—————————————-
प्रतिक्रिया:- अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर व मराठी हॉस्पिटल हिंगणघाट येथे १० बेडची व्यवस्था असून आणखी १५ बेडची वाडीव परवानगी देण्या संबंधाचे पत्र निवासी जिल्हाधिकारी वर्धा यांना मागणी केली व दूरध्वनीवर चर्चा केली त्यावेळी ऑक्सीजन उपलब्ध झाल्याबरोबर वाढीव १५ बेडची परवानगी देण्यात येईल असे सांगण्यात आले.
-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे