केंद्र सरकार व राज्य सरकार रेशनिंग बाबत केलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी त्वरित करावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने मागणी

30
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.27एप्रिल):-राष्ट्रामध्ये कोवीड ने थैमान घातले, लाँकडाऊन करण्या आगोदर त्याच वेळेस माननीय मुख्यमंत्री यांनी सर्वसामान्यांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचे आश्वासन व घोषणा केली यात नंतर केंद्र सरकारने प्रत्येकी मानसी पाच किलो धान्य देण्याची घोषणा केली या सगळ्या घोषणा या आश्वासन आणि हवेत आहेत, तरी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की, ज्या काही योजना व घोषणा राज्य सरकार व केंद्र सरकारने केल्या असतील त्या पद्धतीने वाटपाची सुद्धा भूमिका घ्यावी अन्यथा ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये वाटपाचे टेंडर ज्या ज जिल्ह्यामध्ये आमदार आणि खासदार यांच्या व मंत्राच्या बगलबच्चे दिली आहे ते या धान्या वाटपा मध्ये मोठा भष्टाचार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करत आहेत.

तरी माननीय जिल्हा पुरवठा आधिकारी व सबंधित यंत्रणा आपल्या नेत्याच्या नावाने वाटप करते व यात सुध्दा रेडमिसीवीर सारख राजकारण होतय या गोष्टीकडे गांभीर्याने बघून सर्वसामान्यांना कोवीडमध्ये उद्योग धंदा करू न देणे व घराबाहेर न पडू देणे व इंजेक्शन व आँक्सीजन साठी पेशन्ट मरू देणे अशा प्रकारचे आदेश देऊन फक्त आणि फक्त सर्वसामान्य व गरीब लोकांवरती हुकूमशाही करण्याच्या ऐवजी घोषणा केल्या ते किमान धान्य तरी लोकांपर्यंत पोचवावे कारण लोकांना व सर्वसामान्य जनतेला फार आर्थिक वीज विवेचनाला सामोरे जावे लागत आहेत बँकांची हप्पेते, घराचे हप्प्ते,गाडी, मोबाईल वीज बिलचे हप्प्ते घरामध्ये असणारे लाईट बिल व त्यांचे रिचार्ज व तसेच ऑनलाईन मोबाईल चे मुलांसाठी कलर टि व्ही रिचार्ज या सर्व बाबींना पासून सगळ्यांचा जीव मेतकूट आला आहे, त्यामुळे पक्षाची प्रांजळपणे मागणी आहे की फक्त ज्या काही योजना केंद्राने, राज्यांना घोषणा केल्यात त्याची अंमलबजावणी त्वरित करावी अन्यथा सर्वसामान्य जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीव रिपाई सर्वसामान्याच्या बरोबर आंदोलन करेल.