खुतमापूर येथे सॕनीटायझर‌ची फवारणी

33

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

खुतमापूर(दि.27एप्रिल):-येथे कोरोनाचे पेशंट वाढत असल्यामुळे व चार पाच दिवसात दोन तीन पेशंट दगावल्यामुळे तेथील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी सॕनीटायझरची फवारणी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील कोरणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व नांदेड जिल्ह्यात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण निघत असल्यामुळे पूर्ण जिल्हा भीतीच्या वातावरणात वावरत आहे.

खुतमापूर हे गाव कर्नाटक व आंध्राच्या सीमेवर असल्यामुळे येथील लोकांना काही कारणास्तव या ठिकाणी जावे लागते व या गावचा दोन राज्यात वावर असून येणाऱ्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढू नये यासाठी ग्रामपंचायत कार्यालय खुतमापूर च्या वतीने सॅनिटायझर ची फवारणी हनुमान मंदिर परिसरात व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संपुर्ण परिसरात व ग्रामपंचायत कार्यालय खुतमापूर संपुर्ण परिसरात आणि नवीन आबादी‌ परिसरात फवारणी करण्यात आली. यावेळी अनिल वलकले, बालाजी इंगळे पाटील ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी संजय टोके आधी जण उपस्थित होते