भारतीय बौद्ध महासभा दिग्रस शहर शाखा अध्यक्षपदी अनुसया गंगाधर वाठोरे यांची नियुक्ती

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27एप्रिल):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ (पश्चिम) यांच्या आदेशानुसार ९ तालुक्यांमध्ये नुकत्याच भारतीय बौद्ध महासभेच्या शहर शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आले आहेत . आणि तालुका अध्यक्षांनी शहर शाखा अध्यक्षपदी पुरुषांचीच नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत .

परंतु दिग्रस तालुका शाखेचे अध्यक्ष विनायक देवतळे यांनी शहर शाखा अध्यक्षपदी पुरुषांच्या नियुक्ती ऐवजी त्यांनी महिलांना प्राधान्य दिले कारण की एका महिलेमध्ये परिवर्तन झाले की संपूर्ण कुटुंबामध्ये परिवर्तन होते असा आशावाद ठेवून त्यांनी भारतीय बौद्ध महासभा दिग्रस शहर शाखेच्या अध्यक्षपदी अनुसया गंगाधर वाठोरे यांची नियुक्ती केली आहे. तर सरचिटणीसपदी पुष्पाताई सुरेश वानखेडे आणि कोषाध्यक्ष पदासाठी लताताई यशवंत भरणे यांची नियुक्ती केली आहे.

कोरोना (कोविड-१९)या महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुढील सर्वच पदाधिकारी पदांचा भरणा करण्यात येणार आहे.असे दिग्रस तालुका शाखा अध्यक्ष विनायक देवतळे यांनी सांगितले आहे.तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून धम्माचा प्रचार व प्रसाराचे कार्य प्रभावीपणे व्हावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या .

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED