बाबुराव कोलगंटीवार यांचे वृध्दापकाळाने निधन – सुनेने दिला चितेला अग्नी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27एप्रिल):-येथील हनुमान नगर तुकुम निवासी बाबुराव पूलनाजी कोलगंटीवार यांचे काल दिनांक २६/४/२०२१ रोजी सकाळी ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. महिला समाजसेवी व्यक्तीमत्व श्रीमती सुमनताई कोलगंटीवार यांचे ते पती होत . त्यांना एकूण तीन मुली आहे. त्या सर्व विवाहित आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा विकास कोलगंटीवार गेल्या वर्षी ह्दय विकाराने मरण पावला . तेव्हा मुलाच्या मृत्यू पश्चात त्यांची विधवा पत्नी ॲड. आरती कोलगंटीवार यांनी आपल्या या अपंग सासर्याची वडीलाप्रमाणे शुश्रुषा केली. दरम्यान सुमनताई नागपूर येथे स्थायिक झाल्या .आणि आज सकाळी बाबुराव कोलगटीवार यांचा वृध्दापकाळाने मृत्यू झाला.

नागपूर वरून त्यांची पत्नी सुमन बाबुराव कोलगंटीवार व त्यांच्या मुली कोरोना लाकडाऊनमुळे येऊ शकल्या नाही . तेव्हा गेल्या वर्षभरापासुन अपंग सास-याची वडीलाप्रमाणे अविरत सेवा करणाऱ्या त्यांच्या कर्तबगार सूनबाई ॲड. आरती कोलगंटीवार (आक्केवार ) हिनेच पुढाकार घेत आपल्या दिवंगत सास-याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले आणि स्मशानभूमीत त्यांच्या चितेस अग्नी दिला. अंत्यसंस्कार कामाकरीता तुकूम वार्डातील सुजाण नागरिकांनी उत्तम सहकार्य केले.

कुणाचाही आधार नसताना कोरोनाच्या काळात न घाबरता स्वतः खंबीर राहुन आपल्या आजारी अपंग सास-याची वर्षभर पित्यासमान सेवा करून एक आदर्श समाजापुढे ठेवणा-या ॲड. आरती कोलगंटीवार यांचे अ. भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी कौतुक केले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED