चंद्रपूर जिल्ह्यात (दि.27एप्रिल) रोजी 24 तासात 1603 कोरोनामुक्त,1311 कोरोना पॉझिटिव्ह तर 17 कोरोना बधितांचा मृत्यू

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27एप्रिल):- जिल्ह्यात मागील 24 तासात 1603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1311 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 17 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 55 हजार 680 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 39 हजार 318 झाली आहे. सध्या 15 हजार 534 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 64 हजार 93 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 29 हजार 59 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 51 वर्षीय पुरुष, दत्तनगर वार्ड येथील 62 वर्षीय महिला, स्वावलंबी नगर येथील 63 वर्षीय महिला, तुकूम येथील 60 वर्षीय महिला, पंचशील चौक परिसरातील 47 वर्षीय महिला, दादमहल वार्ड येथील 50 वर्षीय पुरुष, भेंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष राजुरा तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील जिजामाता वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बोर्डा येथील 55 वर्षीय पुरुष, कळमगव्हाण येथील 30 वर्षीय पुरुष,
भद्रावती तालुक्यातील पंचशील नगर येथील27, 33 व 66 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला गोंडपिपरी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 828 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 763, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1311 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 495, चंद्रपूर तालुका 116 बल्लारपूर 44, भद्रावती 36, ब्रम्हपुरी 75, नागभिड 80, सिंदेवाही 72, मूल 46, सावली 20, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 23, राजूरा 40, चिमूर 35, वरोरा 68, कोरपना 122, जिवती 12 व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह आज(27 एप्रिल) 558 नवीन कोरोना बाधित तर 512 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.27: आज जिल्हयात 558 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 512 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 19475 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 14758 वर पोहचली. तसेच सद्या 4366 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 351 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 16 नवीन मृत्यूमध्ये ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 69 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय पुरुष, ता.कुरखेडा जि. गडचिरोली येथील 80 वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता.धानोरा जि. गडचिरोली येथील 66 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, आरमोरी रोड, गडचिरोली येथील 38 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 56 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 30 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 74 वर्षीय महिला, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 55 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.78 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.42 टक्के तर मृत्यू दर 1.80 टक्के झाला.

नवीन 558 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 168, अहेरी तालुक्यातील 53, आरमोरी 54, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 82, धानोरा तालुक्यातील 11, एटापल्ली तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 50, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 58, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 13, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 68 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 512 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 163, अहेरी 31, आरमोरी 37, भामरागड 19, चामोर्शी 30, धानोरा 27 , एटापल्ली 16, मुलचेरा 13, सिरोंचा 20, कोरची 30, कुरखेडा 38, तसेच वडसा येथील 88 जणांचा समावेश आहे.