30 एप्रिलपर्यंत पोलीस भरती जाहिर करा – प्रकाश भैय्या गायकवाड

30

🔸तिन वर्षा पासून मिळेना पोलीस भरतीला मुहूर्त

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.२८एप्रिल):- राज्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस दलावर कामाचा ताण वाढलेला असताना पोलीस भरतीप्रक्रिया राबवण्यासाठी चालढकल होत आहे तीन वर्षावर्षां भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळत नसून अनेकांची वयोमर्यादा संपत चालल्याने बेरोजगारांमध्ये नाराजीचा सुर आहे.पोलीस भरती प्रक्रिया तातङीने राबवण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बाॅइज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैय्या दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पोलीस बाॅइज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश भैय्या गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध लोकांवर कामाचे ओझे वाढले आहे.पोलीसांच्या कर्तव्याच्या वेळा ही ठरवल्या नाहित त्यामुळे तासनतास ऑन ङ्युटी रहावे लागते दरम्यान पोलीस दलात अनेक जागा रिक्त आहेत परंतू पदभरती केली जात नसल्याने उपलब्ध मनुष्यबळालाच कामाचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे सध्या कोविङचे कारण देत पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली जात आहे.

मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण मेहनत घेत आहेत त्यांची वयोमर्यादा संपून जाते की काय अशी भिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक बेरोजगार धास्तावले आहेत दरम्यान ३० एप्रिलपर्यंत पोलीस भरतीची तारीख जाहिर करावी अन्यथा महाराष्ट्र पोलीस बाॅइज संघटना बेरोजगारांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जमा होऊन साकङे घालू असे प्रकाश भैय्या गायकवाड यांनी सांगीतले आहे.