सामाजिक जाण ठेवून कोरोना लस घेण्याआधी प्रत्येक रक्तदात्याने रक्तदान करावे- आमदार श्र्वेताताई महाले

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.28एप्रिल):-दिनांक 1 मे पासून राज्यभर 18 वर्ष वरील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात होईल. 18 वर्ष वरील वयोगट हा रक्तदाता म्हणून ओळखला जातो. पण पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवस रक्तदान करता येणार नाही. तसेच एका महिन्याच्या अंतराने घ्यावी लागणारी दुसरी लस घेतल्यानंतर सुद्धा 28 दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे या वेळात राज्यात रक्ताची मोठी कमतरता जाणवू शकते. राज्यामध्ये सध्यस्थितीला सुद्धा रक्तसाठ्याची कमतरता आहे. त्यामुळे सामाजिक जाण ठेवून कोरोना लस घेण्याआधी प्रत्येक रक्तदात्याने रक्तदान करावे. असे आव्हान चिखली मतदार संघाच्या आमदार श्र्वेताताई महाले यांनी केले.

चिखली विधानसभा मतदार संघातील सर्व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माननीय आमदार श्र्वेताताई महाले यांनी आवाहन केले की त्यांनी आपल्या वॉर्डात, गावात रक्तदान शिबीरांचे आयोजन करून या रक्तदान सेवाकार्यात आपले योगदान द्यावे. या रक्तदान शिबिरांसाठी लागणारी संपूर्ण मदत आमदार यांच्या जन संपर्क कार्यालयाकडून करण्यात येईल. रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी आपण माझ्या कार्यालयाच्या 7559156535 या क्रमांकावर व्हाट्सअँप द्वारे संपर्क करु शकताअसे आव्हान मा. आमदार श्र्वेताताई महाले- पाटील यांनी केले