पुसद येथील मेडीकेअर हॉस्पिटल चालकाला आणखी एका रूग्णांची नोटीस

29

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.28एप्रिल):-कोविड जागतिक महामारीच्या पाश्र्वभूमीवर पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलचे अनेक किस्से चर्चेत असतानाच मांजरीच्या गळ्यात घंटा बांधण्यासाठी पुसद अर्बन बॅकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी पञकार परिषद घेऊन पुराव्यानिशी मेडिकेअर चे पितळ उघडे केल्यानंतर अनेक पिडित रूग्णांनी समोर येत न्यायालयांमध्ये जाण्याची मानसीक तयारी केल्याचे दृष्टीक्षेपात येत आहे.

पुसद येथील शेख बिलाल शेख मदार हे दि. १८मार्च 21 रोजी छातीचा सी. टी .स्कॅन करण्यासाठी मेडिकेअर हास्पिटलला गेले असता त्यांचेकडून रुपये चारहजार दोनशें फी, घेण्यात आली. तसेच शेख बिलाल यांना बेड उपलब्ध असतांनाही शासन दरापेक्षा जास्त पैसे का घेतले याची विचारणा केली, म्हणून मेडिकेअर हॉस्पिटल ने रुग्ण सेवा व उपचार केले नाही,असा गंभीर आरोप शेख बिलाल यांनी तक्रारीतून केला आहे.

कोविडग्रस्त रुग्ण शेख बिलाल यांनी मेडिकेअर हॉस्पिटल मधून उपचाराबाबत नकार मिळताच दूसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले.प्रकृति बरी झाल्यानंतर शेख बिलाल यांनी त्यांचे वकील अँड. विवेक देशमुख यांचे मार्फत मेडिकेअर हास्पिटल चे संचालक डॉ, सतिष चिद्दरवार यांना कायदेशीर नोटीस पाठवून सि, टी,स्कॅनचे अतिरिक्त घेतलेल्या पैशाबाबत विचारणा केली, असून समाधान न झाल्यामुळे न्यायालयात जाण्याची मंडई दिलि आहे,याबाबत मेडिकेअर हॉस्पिटल चे संचालक डॉ, सतिष चिद्दरवार यांचेशी संपर्क साधला असता तो होवू शक‌ला नाही, ~~~~~~~~~~~~~~~~~~