भडणे कोविड सेंटर येथील ७७ वर्षीय बाबांनी केला कोरोनावर मात

78

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)

धुळे(दि.28एप्रिल):-साक्री तालुक्यातील भडणे येथील कोविड सेंटर येथील ७७ वर्षीय बाबांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा उद्रेक तालुक्यातील मृतांची संख्या वाढत असून अनेक रुग्ण धास्ती घेतात.मात्र प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोरोनावर मात करणे शक्य आहे. हे साक्री येथील ७७ वयाच्या व्याक्तीला शक्य झाले आहे. साक्री येथील ७७ वर्षीय जिभाऊ जानकु चव्हाण यांनी दाखवुन दिले आहे. त्यांचा एचआरसीटीसी रिपोर्ट १५ + होता. आणि ऑक्सिजन लेवल ७० पर्यंत खाली आली होती. वृद्धा पण आणि ७७ ला टेकलेत या वयात आणि परिवार कानाडोळा करतात. त्यांना कळेना मग काय बोलायचं त्यांना त्यांच्या परिवाराची काळजी घेणारे मोजके असे परिवाराचे व्यक्तींची साथ लाभली.

त्यांचेही पुत्र श्री शिवदास चव्हाण व रामदास चव्हाण आणि नातू प्रशांत चव्हाण यांनी नात्याची जाणीव ठेवत बाबांना रुग्णालयात दाखल केले. व त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि परिस्थितीना जुमानता त्यांनी अहोरात्र मेहनत करत बाबांची काळजी घेतात त्यांना सुखरूप त्या कोरोना मधून बाहेर काढले. त्यांनी स्वतःला कधीही खचू दिले नाही.

फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर व मुलांच्या व नातुंच्या आधारावर उपचाराला प्रतिसाद दिला. आणि कोरोनाला हरवून दाखवलं. सध्या बाबा आता दवाखान्यातून सुट्टी घेऊन नातवाच्या फार्महाऊसवर आराम करत आहेत. साक्री भडणे कोविड सेंटरमधील यावेळी डॉ. मनोहर शिंदे सर,डॉ. विवेक जाधव सर,डॉ. त्रिलोक भदाणे सर,डॉ. दर्शन टवलारे सर,डॉ. अनामिका,सानप मैडम व सर्व DCHC भाडणे कर्मचारी कर्मचारी यांच्या टीमची कारकिर्दी अभिनंदन केले. व बाबांनी घरी जाताना डॉक्टरांसोबत एक फोटो काढून आभार मानले.