हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात अतिरिक्त डॉक्टर व कर्मचारीवर्ग देण्यात यावे- श्याम इडपवार

26

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.28एप्रिल):-शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप खुपच वाढतांना दिसून येत आहे. कोरोनाकालात रुग्ण व त्याचे नातेवाईक त्रस्त झाले असतांनाउपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेजबाबदार वागणुकीमुळे रुग्ण व नातेवाईकास मनस्ताप होत असल्याचे दिसून येत आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी देशभरतार यांनी शहरास भेट दिली असता कोरोना नियंत्रण व्यवस्थेचा आढावा घेतला होता,अपुरा कर्मचारीवर्ग,डॉक्टरमंडळीची कमतरता याविषयी त्यांना अवगत करण्यात आले,परंतु अजूनही पुरेसे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपलब्ध झाले नाही.येथे सिटी स्कैन,सोनोग्राफि मशीन उपलब्ध असून यासाठी लागणारे तज्ञ एमडी मेडिसिन,रेडियोलाजीस्ट उपलब्ध नाही.कोरोनाकाळात ऑक्सीजनचा तूटवडा असल्याने अनेक रुग्णाना उपचार होने कठिन झाले आहे.यावेळी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते ऑक्सीजन पुरविण्यास तयार आहेत,परंतु पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्यामुळे रुग्णालय सेवा देण्यास असमर्थ ठरित असल्याचे दिसुन येत आहे.

स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात अँटीजेन तसेच आरटीपीसीआर चाचणीसाठी रांगेत दोन-दोन तास रुग्ण उभे राहतात. परंतु जेव्हा त्याचा चाचणीसाठी क्रमांक येतो त्यावेळी कर्मचाऱ्यांची भाषा अरेरावीची असते. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असून कर्मचारी अधिकाऱ्यांनी या वृत्तीस आवर घालावा अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी केली आहे.कोरोनाकाळात रुग्णालय कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे,परंतु कर्तव्याचे भान ठेऊन रुग्णाना जास्तीतजास्त औषधी व उपचारसुविधा देण्यात याव्या याकडे लोकप्रतिनिधी,नगरसेवक,सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवणे सुद्धा गरजेचे आहे.