साहेब, आमचे डाक्टर कुठे गेले?

38

🔸कुजबा वासीयांचा आरोग्य अधीकारी यांना प्रश्न

✒️कुही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कुही(दि.29एप्रिल):- तालुक्यातील कुजबा येथील आयुर्वेदिक दवाखाण्यात डाक्टर च येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे म्हणुन आमचे डाक्टर कुठे गेले असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य शफी कुरेशी यांनी उपस्थीत केला.सध्या कोवीड सह सर्दी ताप खोकला, ताप ईतर आजाराचे रुग्ण गावात आहेत कुजबा हे गाव नदीच्या काठावर आहे मग मांढळला औषधोपचारा करीता यावे लागते हे अंतर १२ कीलोमीटर आहे सार्वजनीक वाहतुकीची साधने बंद आहेत कोवीडच्या भीतीने कुणीही आपल्या दुचाकीवर न्यायला घाबरतात अशा परीस्थीतीत ज्यांच्याकडे साधन नाही त्यानी औषधाअभावी घरीच मरावे का? असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य शफी कुरेशी यांनी प्रशासनाला केला आहे.

अशा आणीबाणीच्या परीस्थीतीत शासनाने डाक्टर उपलब्ध करुन द्यावेत श्रीमंत लोक शहरात जाउन खाजगी हास्पीटलमधे औषधोपचार करीत आहेत ज्यांचे राजकीय वजन आहे त्यांना आमदार खासदार मंत्री ही आरोग्य सुवीधेसाठी मदत करतात पण गरीब माणुस हा फक्त सरकारी आरोग्य यंत्रणेच्या भरोशावर जगत आहे.कुही तालुक्यातील अनेक गरीब रुग्ण शहरात वनवन भटकत आहेत खाजगी हास्पीटलमधे रूग्णाची प्रकृती पेक्षा आर्थीक स्थीती कशी आहे नगदी कीती रूपये जमा करू शकणा यावर भरती करायचे की नाही ते ठरवतात.

अशा भटकंतीत आवश्यक औषधोपचार अभावी अनेकांनी जीव गमावला आहे.प्रधानमंत्री, आरोग्य मंत्री विभागीय आयुक्त, जील्हाधीकारी दररोज जनतेला आवाहन करतात की, कोरोणाची लक्षणे वाटली तर डाक्टरला तातडीने भेटा पण ईथे डाक्टरच नाही तर कुणाला भेटायचे असा प्रश्न आहे.वर्षभरापासुन ही परीस्थीती आहे तरी सुध्दा शासनाने आरोग्य विभागात डाक्टर,नर्स, आरोग्य सेवक यांची पदभरती केली नाही म्हणजे सराकार गरीबांच्या आरोग्याबाबत खरच गंभीर आहे का? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.तातडीने डाक्टर पाठवीण्याची विनंती कुजबा येथील ग्रामपंचायत सदस्य शफी कुरेशी,जीतु भोयर, भाऊराव नींबर्तै यांनी शासनाकडे केली