संतोष मोतीराम ढोले यांचे निधन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.29एप्रिल):-राजेश ढोले रिपाई शहर सचिव पुसद तथा रिपब्लिकन वार्ता न्युज यवतमाळ प्रतिनिधी यांचे लहान बंधू संतोष मोतीराम ढोले हल्ली मुक्काम पिंपळे गुरव पुणे येथे राहत होते.आज त्यांचे निधन झाले .

गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून कोरोणा पॉझिटिव्ह असल्यामुळे पुणे येथे आय.सी.यू.मध्ये भरती होते. परंतु आज ११:३० वाजता त्यांचे निधन झाले . यावेळी त्यांचे वय ३८ वर्षे होते .

त्यांच्या पश्चात पत्नी महानंदा,मुली शितल, मानशी,व चंचल, मोठे बंधू बाबाराव ढोले, राजेश ढोले, दादाराव ढोले, आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. त्यांचा अंत्यसंस्कार पुणे येथे करण्यात आले.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED