कळवण परिसरात वळीव बेमोसमी गारांच्या पावसाचा तडाखा

28

🔹भाजीपाला पिका सह आंब्यांचे ही प्रचंड नुकसान

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.29एप्रिल):- कळवण तालुक्यात बेमोसमी वळीव पाऊसाने गारा सह हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग ने फेब्रुवारी महिन्यात भाजीपाला पिके टोमॅटो हिरवी मिरची कोबी फ्लॉवर वाल पापडी कोथांबिर करले वांगी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती परंतु त्या सर्व भाजीपाला पिकांवर बेमोसमी पाऊसाने गारा सह तडाखा दिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी वर्ग ने अत्यंत मेहनतीने पिके जमवली आणि त्यातही मोठ्या प्रमाणात पिकावर खर्च म्हणजे फवारणी निदनी चा खर्च बघितला तर तो मोठ्या प्रमाणत केला ह्या पाऊसाचा दुष्परिणाम म्हणजे करपा रोगाचा प्रादुर्भाव कितीही फवारणी केली तरी हा करपा रोग पिकाला सुकवून पीक नष्ट करण्याचे काम करत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे पाळे खुर्द परिसरात आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहे कधी नव्हे ते यंदा आंब्या च्या झाडांना भव्य फळ आलेले होते परंतु वादळी वारा गारा पाऊस या मुळे आंबा फळ जमीनदोस्त झाले त्यामुळे यंदा लोणचे बनवणे अवघड होईल कारण पाळे खुर्द परिसरात गावरान जातीचे आंबे मोठ्या प्रमाणात असून शेतकरी ह्याच आंब्याचे लोणचे वर्षभरासाठी बनवतो कारण शेतकरी जीवनात न्याहारी ही दररोज लोणचे भाकरी चीच असते त्यामुळे शेतकरी वर्गाची भाजीपाला पिकांबरोबर लोणचे भाकरी सुद्धा ह्या बेमोसमी पावसामुळे जाणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले
[त्याचप्रमाणे यापावसाने घरांचे पण नुकसान केले आहे एकलहरे शिवारात नाना पुंडलिक मोहन ह्या शेतमजुरां ने शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपये घर बांधणी साठी उचल घेऊन घर बांधलेले होते ते राहते घरावरील पत्रे वाऱ्याने उडून घराच्या भिंतीची पडझड झाल्याने नाना पुंडलिक मोहन यांचा पूर्ण संसार उत्वस्त झाला आहे