हिंगणघाट तालुक्यात आर.टि.पी.सी.आर तपासणी अहवाल प्रयोगशाळा केंद्र तात्काळ सुरू करा

29

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.29एप्रिल):- तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.हिंगणघाट तहसील हि साक्षरतेच्या प्रमाणात महाराष्ट्रातून सर्वात साक्षर असलेली तहसील म्हणुन ओळखली जाते. त्याच बरोबर मोठ-मोठे उद्योग असल्यामुळे या तालुक्यातील बाजारपेठ सुध्दा नावलौकीक आहे.हिंगणघाट तालुक्याची कोरोना चाचणी ची गती वाढविण्यात आली आहे, परंतू आर.टि.पी.सी.आर तपासणीचा नमुना वर्धा-नागपुर येथे पाठविल्या जाते त्यामुळे आर.टि.पी.सी.आर तपासणीचा अहवाल प्राप्त होण्यास २४ तासा पेक्षा जास्त विलंब होत आहे.

व कोरोना तपासणी केंद्रावर नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने संपुर्ण व्यवस्थेवर ताण येत असून व्यवस्था कोलमडत आहे. त्यामुळे तपासणी केंद्रावर नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी आर.टि.पी.सी.आर तपासणी अहवाल प्रयोगशाळा केंद्र हिंगणघाट येथे खाजगी किंवा उपजिल्हा रूग्णलयात सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनातून केली आहे.

वर्धा जिल्हात व हिंगणघाट तालुक्यात कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता कोरोना तपासणी केंद्र वाढविण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय कोरोना तपासणी केंद्रावर व खाजगी रूग्णालय येथे नागरीकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता अधीक झाली आहे. तसेच तपासणी केंद्रावर मोठा ताण निर्माण होत असल्याने नागरीकांची चांगलीच गैरसोय होत आहे.एका केंद्रावर एकाच दिवशी हिंगणघाट तालुक्यात शेकडो नागरीकांची तपासणी होत असल्याने याचा परीणाम अहवाल मिळण्याच्या गतीवर होतांना दिसून येत आहे.

परीणामी आर.टि.पी.सी.आर तपासणीच्या अहवालासाठी नागरीकांना २४ तासांहून आधीक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. हिंगणघाट येथे कोरोनाची आर.टि.पी.सी.आर चाचणी केल्यावर रूग्णांचा नमुना नागपूर आणी वर्धा येथे पाठविल्या जाते. तरी आर.टि.पी.सी.आर चा अहवाल तपासणी केलेल्या रूग्णांना मिळण्यासाठी चोविस तासाच्या आधीक काळ वाट पाहावी लागत असून रूग्णांसाठी गैरसोय होतांना दिसून येत आहे.

या दरम्यान अनेक रूग्णांची प्रकृती खालवल्याने मृत्यु होण्याचा प्रकारही समोर आले असे दिसून येत असून कोरोना उपचारासाठी आर.टि.पी.सी.आर अहवालाची वाट पाहावी लागत आहे.त्यामुळे नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांना योग्यवेळी उपचार मिळावा या करीता आर.टि.पी.सी.आर तपासणीचा नमुना वर्धा नागपूर येथे न पाठवता हिंगणघट येथे खाजगी किंवा उपजिल्हा रूग्णलयात तपासणी अहवाल प्रयोगशाळा केंद्र तात्काळ सुरू केल्या गेले तर २४ तासाच्या आत रूग्णांना आर.टि.पी.सी.आर चाचणी चा अहवाल देण्याचे सोपी जाईल.असे मत सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांनी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केले आहे.