दिव्यांगाना मोफत घरपोच कोरणा लसीकरण करा

✒️नांदेड प्रतिनिधी(माधव शिंदे)

नांदेड(दि.29एप्रिल):- जिल्ह्यातील 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना मोफत घरपोच लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, दिव्यांग व्यक्तींना या काळात घराबाहेर पडणे खूप अवघड असते. जर ते घराबाहेर पडले तर त्यांनी मदत कोण करणार अशा कोरोना काळात कोणीही कोणाच्या जवळ येत नाही, जर दिव्यांग व्यक्तीला जर दवाखान्यात जायचे म्हटले तर त्याच्या सोबत येणार कोण? याचा विचार आरोग्य विभागाने करून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस द्यावी.

अगोदर प्रत्येक व्यक्तीची कोरणा चाचणी करून घ्यावी, व नंतरच कोरूना प्रतिबंधक लस द्यावी प्रशासनाने व आरोग्य विभागाने याकडे पुरेपूर लक्ष देऊन दिव्यांग व्यक्तींसाठी योग्य ते मार्ग सुचवावेत. जर त्यांना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावले तर ते कोणासोबत येणार याचा मोठा प्रश्न समाजासमोर उभा आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दिव्यांग व्यक्तीच्या घरी जाऊनच कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, असे मत पत्रकार शुभम बेद्रे यांनी व्यक्त केले.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED