प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उदगीर तालुक्याच्या वतीने गरजूना १००० मास्क वाटप

✒️उदगीर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उदगीर(दि.30एप्रिल):- प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ उदगीर तालुका युवाध्यक्ष राहुल शिवणे यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी नामदेव घुगे, मनोज फड, राम घुगे यांचे सहकार्य लाभले. पत्रकार राहुल शिवणे यांचे सामाजिक कार्य पाहून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजूळे यांनी राहुल शिवणे यांची उदगीर तालुका युवा अध्यक्षपदी निवड केली आहे. निवड झाल्यानंतर राहुल शिवणे यांनी १००० मास्क वाटप केले व लवकरच सॅनिटायजर वाटप व जंतूनाशक फवारणी करणार असल्याचे राहुल शिंदे यांनी माहिती दिली.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवाध्यक्ष राहुल शिवणे यांनी सर्व जनतेला विनंती केली आहे की, सर्वांनी या कोरोना महामारीच्या काळात विना कारण फिरु नका, मास्कचा वापर करा, सॅनिटायजरने हात स्वच्छ धुवावेत आणि पूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजन’ कमी पडत आहे म्हणून अनेक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत त्यामुळे सर्वानी कमीत कमी दोन झाडे लावावेत असे आवाहन केले आहे. झाडे लावा झाडे जगवा पर्यायवरणाचे रक्षण करा असा संदेश संघाच्या वतीने देण्यात आला. राहुल शिवणे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED