राष्ट्रसंताची जयंती ग्रामजयंती म्हणून घरोघरी ग्रामगीता वाचनाने साजरी – आभासी पध्दतीने प्रबोधनात्मक विचारमंथन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.30एप्रिल):- राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समितीच्या वतीने राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांची ११२ वी जयंती अर्थात ग्रामजयंती विविध वैयक्तिक आभासी उपक्रमातून साजरी करण्यात आली. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन व्हॕट्सॲप माध्यमातूनही करण्यात आले. घरातुन बाहेर न पडता महिलांसाठी घर तेथे रांगोळी रेखाटन , विद्यार्थ्यांकरीता चित्रकला स्पर्धा , तसेच घरच्या सदस्यांनी घरस्वच्छता आणि घरीच ग्रामगीता वाचन असा सर्वांनाच सोयीचा उपक्रम घेण्यात आला.स्पर्धकांनी आपल्या उपक्रमाचे छायाचित्र आयोजक समितीकडे पाठविले.

कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सामुदायिक ध्यानपाठ व प्रार्थना, मान्यवरांचे मार्गदर्शन घेण्यात आले. रांगोळी स्पर्धेत कु. प्रतिक्षा कापगते , डिम्पल चौधरी, नेहा सुर, उर्मिला मोहितकर,वृंदा हुलके, सुनीता पावडे,सुषमा उगे,रिता वैद्य,अनुश्री चोरे ,मनिषा बन्सोड , मालू कोंडेकर,सारिका जेनेकर यांनी भाग घेतला तर चित्रकला स्पर्धेत अवंती उगे,उमंग वैद्य,ऋग्वेद कोंडेकर , संस्कार खोंडे ,अनिरूध्द देसाई ,प्राजक्ता बोढेकर, केतकी कावळे,रुद्र वासाडे,ओम पावडे ,रोहिणी खाटीक ,पारंगत मेंढूलकर आदींनी सहभाग घेतला.सामुदायिक प्रार्थनेवर प्रा.श्रावण बानासुरे,प्रा राजेंद्र सोनोवणे,डाँ शिवनाथ कुंभारे यांचे मार्गदर्शन झाले तर सामुदायिक ध्यानावर अनिल चौधरी, नामदेव गेडकर तसेच नवयुवकांना मार्गदर्शन या उपक्रमात सिआरएफ कमांडर चेतन शेलोटकर यांनी विचार मांडले तर कोरोना काळातील वाढलेल्या समस्या व उपाय यावर अरुण भोसले यांनी मार्गदर्शन केले.ग्रामाधिष्ठीत ग्रामगीता विषयावर व्याख्यान ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाले की , राष्ट्रसंतानी मानवधर्म सांगीतला.

ममतेतून समता , समतेतून संघटन आणि पुढे संघटनेतुन अभ्युदय असा विवेकशील मार्ग आपल्या साहित्यातून दिलेला आहे. त्यांच्या ह्या जीवनवादी साहित्याचे वाचन घरोघरी व्हावे ,असे बोढेकर म्हणाले. महिलोन्नती विषयावर श्रीमती कुसुमताई आलाम यांनी घरातील कुटूंबप्रमुखाची जबाबदारी , मुलांवरील संस्कार, तसेच आदिवासी स्त्रीयांच्या समस्या यासंबंधी विस्तृतपणे विचार मांडले. सौ. अंजनाबाई खूणे यांचेही काव्यगायन झाले. सप्तखंजिरी वादक उदपाल वणीकर यांचे प्रबोधनात्मक कीर्तन झाले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी केले. संपूर्ण आभासी कार्यक्रमाचे नियोजन रामकृष्ण चनकापुरे , देवराव कोंडेकर ,राजेंद्र मोहितकर ,संजय तिळसम्रूतकर ,श्रीकांत धोटे , संजय वैद्य , सुखदेव चौथाले , विलास उगे,उदय धकाते,विनायक साळवे, नामदेव पिज्दूरकर ,मोहनबापू चोरे, नारायण सहारे , सुभाष पावडे , शंकर दरेकर आदींनी नियोजन बद्ध कार्यक्रमाची आखणी केलेली होती. शेवटी राष्ट्रवंदनेने सांगता करण्यात आली.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED