चंद्रपूर जिल्ह्यात (दि.30एप्रिल) रोजी 24 तासात 1415 कोरोनामुक्त, 1667 कोरोना पॉझिटिव्ह तर 28 कोरोना बधितांचा मृत्यू

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.30एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 1415 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1667 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 60 हजार 312 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 42 हजार 823 झाली आहे. सध्या 16 हजार 584 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 76 हजार 722 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 11 हजार 662 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील रामनगर येथील 70 वर्षीय महिला व 74 वर्षीय पुरुष, छत्रपती नगर येथील 49 वर्षीय पुरुष, 37 व 61 वर्षीय पुरुष, विश्वकर्मा नगर येथील 52 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी परिसरातील 62 व 72 वर्षीय पुरुष, रयतवारी कॉलनी परिसरातील 43 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 27 वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील 55 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 62 वर्षीय महिला, बोर्डा चंद्रपूर येथील 70 वर्षीय महिला, भिवापूर येथील 78 वर्षीय पुरुष.
वरोरा तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, जिवती तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, खापरी येथील 76 वर्षीय महिला, मासळ येथील 50 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, तळोधी येथील 65 वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्या नगर येथील 75 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, भंडारा येथील 58 वर्षीय महिला, सावर्ला-पवनी येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 905 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 836, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1667 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 381, चंद्रपूर तालुका 81, बल्लारपूर 119, भद्रावती 177, ब्रम्हपुरी 69, नागभिड 88, सिंदेवाही 57, मूल 58, सावली 26, पोंभूर्णा 19, गोंडपिपरी 49, राजूरा 107, चिमूर 60, वरोरा 205, कोरपना 142, जिवती 11 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह आज(30 एप्रिल) 519 नवीन कोरोना बाधित तर 577 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.30एप्रिल):-आज जिल्हयात 519 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 577 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 21177 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 16225 वर पोहचली. तसेच सद्या 4552 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 400 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 16 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी ,63 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा , 43 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी, 65वर्षीय पुरुष देसपूर ता. आरमोरी, 20 वर्षीय महिला पेट ता. चामोर्शी, 67 वर्षीय पुरुष गोगांव ता. गडचिरोली, 51 वर्षीय पुरुष वडधा ता. आरमोरी, 70 वर्षीय पुरुष वडसा, 58 वर्षीय पुरुष गडचिरोली, 33 वर्षीय पुरुष कुरखेडा , 68 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा, 40 वर्षीय पुरुष मोझरी ता. आरमोरी, 50 वर्षीय पुरुष नागभीड जि. चंद्रपूर, 80 वर्षीय पुरुष एटापल्ली, 69 वर्षीय पुरुष हरबी डोंगरगांव ता. वडसा, 65 वर्षीय पुरुष बेलगांव ता. कुरखेडा, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.62 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.50 टक्के तर मृत्यू दर 1.89 टक्के झाला.

नवीन 519 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 182, अहेरी तालुक्यातील 38, आरमोरी 46, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 53, धानोरा तालुक्यातील 22, एटापल्ली तालुक्यातील 46, कोरची तालुक्यातील 06, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 15, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 36 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 39 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 577 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 174, अहेरी 51, आरमोरी 69, भामरागड 13, चामोर्शी 35, धानोरा 33 , एटापल्ली 39, मुलचेरा 10, सिरोंचा 18, कोरची 18, कुरखेडा 46, तसेच वडसा येथील 71 जणांचा समावेश आहे.