चादंवङ येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नियमांचे पालन करावे-प्रांताधिकारी देशमुख

28

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.30एप्रिल):-चादंवङ शहरात सुरू असलेल्या कोविड लसीकरण केंद्रावर चांदवडचे प्रांत अधिकारी श्री चंद्रशेखर देशमुख यांनी पाहणी केली असता काही नागरिक अंतर न ठेवता गप्पा मारताना आढळले,यावेळी प्रांताधिकारी यांनी मात्र नागरिकांना कडक भाषेत सुनावले.यापैकी 1 जरी पॉझिटिव्ह असेल तर फैलाव होऊ शकतो.

त्यामुळे नागरिकांनी 6 फुटाचे अंतर ठेवून उभे राहावे किंवा वयस्कर व्यक्तींनी बसून घ्यावे.नियमांचे पालन न केल्यास केंद्र बंद करून टाकू अशी तंबी दिल्यावर नागरिक बरोबर पांढऱ्या चौरसात बसलेले दिसले .

यावेळी प्रांताधिकारी यांनी कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना उपस्थित नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे दिल्या.यावेळी चांदवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री अभिजित कदम, अभियंता श्री शेषराव चौधरी,न प कार्यालय अधिक्षसक हर्षदा राजपूत, आरोग्य पर्यवेक्षक वाय बी जाधव,घनश्याम आंबेकर,घाटे,दीपक जामदार,जनता शाळा मुख्याध्यापक श्री पगार सर,शिंदे सर आदी उपस्थित होते.