निकृष्ट प्रतिचा मका स्वस्त धान्य दुकानातून जनतेस होतंय वाटप

31

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1मे):-अन्नधान्य पुरवठा विभागातुन वाटप सुरू असलेला निकृष्ठ प्रतिची मका महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या दिला जात आहे, कोरोना महामारीच्या काळामध्ये अध् वट लाँकडाऊन च्या पाश्वभुमीवर स्वस्त धान्य पुरवठा किती सकस आहार दिला जात आहे याचे हे जीवंत व ज्वलंत उदाहरण असून अन्नधान्य पुरवठा विभागातुन जनतेला मका धान्य पुरवठा जनावरांच आहार समजून वाटप करण्यात येत आहे का?

किंवा अन्नधान्य पुरवठा विभागातुन सांगावे की मका धान्य गोरगरिबांनी कशी खावी महाराष्ट्रातील जनतेला
ज्वारी, बाजरी, गहु खाण्याची पद्धत माहिती असली तरी
या मका धान्याची खाण्याची पद्धत सांगावी, यांची रेसीपी सांगावी व महाराष्ट्रातील जनतेवर क्पा करावी अशी विनंती
जनता करित आहे