नितीनकुमार डोंगरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ

27

🔸जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमा संवर्धनात डोंगरे यांचे मौलाचे योगदान

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.30मे)- जिल्हा माहिती कार्यालयाचे श्री. नितीनकुमार डोंगरे यांनी सेवाकालावधीमध्ये प्रसिद्धी विषयक कामकाजामुळे जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमा संवर्धनात मौलाचे योगदान दिले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या. श्री. डोंगरे यांना आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, गाडवे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, पत्रकार संघाचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे आदि पत्रकार उपस्थित होते.श्री. डोंगरे यांच्या निरोप समारंभ आयोजीत कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार केला.

श्री. डोंगरे हे 1991 पासून सामूहिक दूरचित्रवाणी योजना विभागात तंत्र अधिकारी पदावर कार्यरत होते. सन 2001 वर्षी सामूहिक दूरचित्रवाणी विभाग बंद झाल्यानंतर त्याची माहिती व जनसंपर्क विभागात पदस्थापना करण्यात आली. ते सलग 20 वर्ष जिल्हा माहिती कार्यालयात अत्यंत प्रामणिक व इमाने इतबारे सेवा बजावली. त्यांनी सुमारे 30 वर्षांची अखंडीत सेवा करून ते आज सेवानिवृत्त झाले आहे. यावेळी माहिती सहायक सतिश बगमारे, कॅमेरामन चंद्रकांत पाटील, लिपीक वर्षा मसने, हबीब शेख, रोनिओ ऑपरेटर सुनिल टोमे यांनी श्री. डोंगरे यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.