आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते उपज़िल्हा रुग्णालय हिंगणघाट ला पुन्हा पाच पोर्टेबल वेंटीलेटर (एन .आय. व्ही ) भेट

29

✒️इकबाल पैलवान(हिंगनघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.2मे):-केंद्रीय दळनवळन मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी* यांचे प्रयत्नातुन प्राप्त झालेले या अगोदर 04 व आज 05 असे एकूण 09 पोर्टेबल वेंटीलेटर (NIV) *आ. समीरभाऊ कुणावार* यांचे कार्यालयातून हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयाला हस्तातंरीत करण्यात आले. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन सर्वत्र थैमान घातले आहे.मोठ्या प्रमाणावर रुग्नसंख्या सुद्धा वाढत आहे.उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी 29-04-2021 ला आढावा घेतला असता त्यादिवशी असे कळले की रुग्णालयांमध्ये रोज ओपीडी मध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये येत असून त्यामध्ये सिरीयस पेशंट जास्त प्रमाणामध्ये येत आहे असे आढळून आले.

त्यानुसार तेथील सर्व ऑक्सिजन बेड हे वारंवार पूर्णच्या पूर्ण भरून राहत असल्यामुळे नवीन आलेल्या पेशंटला ऑक्सिजन बेड मिळवून देणे कठीण असल्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजनची कमी असल्याचे आढळून आले. त्यानुसार नागपूर वरून पुन्हा *केंद्रीय दळण वळण मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी साहेबांना* विनंती करून पाच नग NIV पोर्टेबल वेंटीलेटर पाच लक्ष विधि किमतीचे मागितले आणि त्यांनी उपलब्ध करून दिले. हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयाला एकूण 09 पोर्टेबल वेंटीलेटर प्राप्त झाल्याने गंभीर रुग्नाणा दिलासा मिळणार आहे असे सांगून *आमदार समीरभाऊ कुणावार यांनी मा. ना. नितिनजी गडकरी यांचे आभार मानले*. व आज दिनांक 1 मे 2021 रोजी ला उपजिल्हा रुग्णालयाचे *अधिकारी मा. डॉ. चाचारकर साहेब* यांच्या स्वाधीन दिले.

त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात छोटे ऑक्सीजन सिलेंडर असून त्याला ऑक्सीजन फ्लो मीटर नव्हते आणि सध्या ऑक्सिजन फ्लो मीटरचा प्रचंड तुटवडा पूर्ण राज्यामध्ये असल्यामुळे कुठेही ते मिळत नव्हते नागपूरला संबंधितांना *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी फोन करून पाच नग ऑक्सीजन फ्लो मीटर प्राप्त करून उपजिल्हा रुग्णालया चे *अधिकारी डॉ. चाचारकर* यांना देण्यात आले.हे पाच पोर्टेबल वेंटीलेटर असल्यामुळे जास्तीची दहा रुग्णांची सोय झालेली आहे. ही चांगली उपलब्धी आहे. औषधो उपचार कसा चांगला होईल याबद्दल सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.

त्याच प्रमाणे सिरीयस पेशंट ला रेफर करण्यासाठी हिंगणघाट वरून वारंवार पाठपुरावा हा सेवाग्राम व सावंगी हॉस्पिटल येथे करण्यात येत असून त्या प्रमाणे रेफर ला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेक पेशंट रेफर झालेले आहे. आज दिनांक 01 मे 2021 रोजी 17 कोरोना रुग्णांना कोरोना वरती मात करून डिस्चार्ज दिल्याचे याप्रसंगी *डॉ. चाचारकर साहेब व नोडल अधिकारी डॉ. पाराजे मॅडम* यांनी सांगितले. आतापर्यंत जवळपास 180 कोरोना रुग्ण कोरोना वरती मात करुन पूर्ण पणे बरे होऊन घरी गेल्याचे कळते.