प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ निलंगा तालुक्याच्या वतीने गरजूंना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

🔸महाराष्ट्र दिनानिमित्त केले होते आयोजन

✒️निलंगा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

निलंगा(दि.2मे):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ निलंगा तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामीण भागातील गरजूंना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने व राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, अजयभाऊ सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, लातूर महिला जिल्हाध्यक्षा वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ निलंगा तालुक्याच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील गरजूंना, मास्क व सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले. यावेळी संचारबंदीचे नियम पाळा, विनाकारण बाहेर फिरू नका, सतत मास्कचा वापर करा, वारंवार हात स्वच्छ धुवा अशी जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे निलंगा तालुका अध्यक्ष द्रोणाचार्य कोळी, शेषेराव कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य जगदीश सुर्यवंशी, कैलास लामतुरे, यांची उपस्थिती होती. कोविड १९ चा ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण परिसरात मास्कचा अत्यल्प वापर होत असल्याचे पाहूनच जनजागृती करून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्रातील सतत सामाजिक उपक्रमशील कार्य करणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, लातूर जिल्ह्यातील ३५ कोविड योद्ध्यांचा सन्मान असो, फूटपाथवर राहणाऱ्या गरिबांना अन्नछत्र देने, पत्रकार, डॉक्टर, नर्स यांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देणे, आदिवासी भागात शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे असे अनेकविध सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जनसामान्यांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात अनेक तालुक्यात या संघाचे पदाधिकारी व सदस्य विस्तारलेले असून सतत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.या उपक्रमशील कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, जिल्हा संघटक संजय राजूळे, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा महिला संघटक छाया गुनाले, जिल्हा युवा अध्यक्ष सुनील कांबळे, युवा उपाध्यक्ष रवी बिजलवाड व सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी आणि सभासद यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED