लस खपवण्यावर ठाकरेंचा जोर का? – नॅशनल सोशालिस्ट पार्टीचा सवाल

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.2मे):-ठाकरे सरकारने लाॅकडाऊन करत लोकांचे रोजगार बंद पाडले. एक वर्षापासुन लाॅकडाऊन चा मार सहन करत लोकांचं सेव्हिंग्ज संपले. मात्र गृहकर्जाचा हप्ता, लाईट बिल, घरपट्टी, पाणी बिल माफ करण्याची बुद्धी झाली नाही. ठाकरे सरकारने 9000 रुपये एक दिवसासाठी एका बेडला या प्रमाणे डाॅक्टरला लुटीचे लायसन्स दिले. 900 रुपयाचे रेमडीसिव्हर हजारो रुपये किमतीने ब्लॅकमार्केट ने विकले जात आहे त्यावर ठाकरे सरकारचा कोणताही अंकुश नाही. डाॅक्टरांना कोरोना कसा बरा करायचा याचं कोणतंही ज्ञान नसताना गव्हर्मेंट गाईडलाईन प्रमाणे प्रयोग करुन माणसं मारण्याची परवानगी दिली.

कोरोना वॅक्सिन घेऊन लोक मरत आहेत पण तरीही लस देण्याचा ठाकरेंचा अट्टाहास का आहे. १२ कोटी वॅक्सिन घेऊन नक्की कोणाचा फायदा होणार आहे. पडद्यामागे नक्की कोण आहे . लोकांच्या जीवाशी ठाकरे का खेळत आहेत. किती काळ साव बनुन लोकांना फसवणार आहात. कोरोना फक्त एक भिती आहे . जी सरकारने प्रमोशन करुन निर्माण केली आहे. 85 लाख कोटींचा हा भ्रष्टाचार किती लोकांचे बळी घेणार आहे. असे अनेक सवाल नॅशनल सोशालिस्ट पार्टीने ठाकरे सरकारला करत माणुसकीचे दर्शन घडवण्याचे आवाहन सरकारला केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED