कोरोना बाधितांना पतंजली तर्फे टेलीमेडिसीन च्या माध्यमातून मिळणार मोफत मार्गदर्शन

27

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2मे):-पतंजली योग समिती परभणी तर्फे संपूर्ण जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या परिवारातील व्यक्तींना टेली मेडिसन च्या माध्यमातून आयुर्वेद व योग विषयक मोफत मार्गदर्शन लवकरच करण्यात येणार आहे असे पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी निखिल वंजारे यांनी सांगितले आहे. डिजिटल माध्यमातून याचा प्रचार ,प्रसार केला जाईल. टेलीमेडिसीन च्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक आयुर्वेदिक औषधी तसेच शारीरिक व मानसिक मनोबल वाढवण्याकरिता कोणता योगा अभ्यास करावा याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी पतंजली योग समिती परभणी तर्फे 10 तज्ञ योग शिक्षक तथा डॉक्टर यांची एक टीम तयार केलेली आहे जी कोरोणा बाधितांना मार्गदर्शन करणार आहे.

यामध्ये डॉ. शिवप्रसाद सानप, निखिल वंजारे, गोपाळ मंत्री ,डॉ. संदीप चव्हाण, डॉ. योगेश मल्लुरवार, चंपालाल देवतवाल, प्रकाश डीकळे, अविनाश खरात, लाला पांचाळ, उद्धव देशमुख हे योग शिक्षक जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना टेलीमेडिसीन च्या माध्यमातून मार्गदर्शन करतील व लवकरच त्यांचे संपर्क क्रमांक सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले जातील. याविषयी पतंजली योग समितीचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी शुक्रवार दिनांक 30 एप्रिल रोजी जिल्हा संघटनेला वर्च्युअल वेबिनार द्वारे मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी टेलिफोन, मोबाईल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून कोणती आयुर्वेदिक औषधे, योगाभ्यास महत्त्वाचे आहेत जेणेकरून रुग्ण या महामारी तून लवकर बरे होतील याची माहिती दिली.

यामध्ये उष्ट्रासन, मकरासन, भुजंगासन, शशकासन, मर्कटासन, उत्तानपादासन ,नौकासन, इत्यादी आसने तर भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम ,उदगीत इत्यादी प्राणायाम तसेच योग निद्रा चा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच पौष्टिक आहार, सकाळचे ताजे ऊन, सूर्यनमस्कार या सर्व गोष्टी करणे सुद्धा आवश्यक आहे असे सांगितले. तसेच औषधी यज्ञ ज्यात कडूलिंबाची वाळलेली पाने, कापूर ,पंचगव्य, समिधा इत्यादीचा वापर केल्यास निश्चितच कोरोणा रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होईल असे सांगितले. तरी जास्तीत जास्त कोरोणा रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी पतंजली योग समिती तर्फे चालवल्या जाणाऱ्या या मोफत टेलीमेडिसीन मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.